Olive Oil in Marathi – ऑलिव्ह ऑईलचे फायदे

0
257
Olive Oil in Marathi
Olive Oil in Marathi

olive oil in marathi – अँटीऑक्सिडेंटने समृद्ध ऑलिव्ह ऑइल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् चा खजिना आहे, अनेक तज्ञ या फॅटी ऍसिडस् ला योग्य चरबी मानतात व ही आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Name of olive oil in marathi – ऑलिव्ह ऑइल ला मराठीमध्ये काय म्हणतात ?

ऑलिव्ह ला मराठीमध्ये जैतून अशे म्हणतात, मात्र बऱ्यापैकी लोक आता याला ऑलिव्ह असेच म्हणतात.

ऑलिव्ह ऑईलमधील अँटीऑक्सिडेंट्स शरीराच्या सेल्युलर नुकसानीपासून वाचवते ज्यामुळे आरोग्य सुरळीत राहते आणि अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी ताकद मिळते. 

एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल ची चव कडू असते, परंतु या प्रकारच्या तेलावर कमीतकमी प्रक्रिया होत असल्याने इतर प्रकारच्या ऑलिव्ह ऑईलच्या तुलनेत जास्त अँटीऑक्सिडेंट असतात.

Advertisement

या लेखात आपण, ऑलिव्ह ऑइलच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत तसेच त्यांचा कसा वापर करायचा हे देखील आपण बघणार आहोत.

हा लेख वाचा – Fennel Seed In Marathi बडीशेप खाण्याचे फायदे 

Benefits Of Olive Oil In Marathi – ऑलिव्ह ऑईलचे फायदे

अनेक रिसर्चमध्ये ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यविषयक फायदे दिले आहेत. olive oil मधील अँटीऑक्सिडेंट शरीरातील फ्री रेडिकल कमी करतात.

जर शरीरात बरेच फ्री रेडिकल तयार झाले तर ते ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण करू शकतात.  यामुळे पेशींचे नुकसान होऊन कर्करोगाच्या काही प्रकारच्या विशिष्ट रोगांच्या विकासामध्ये ही भूमिका निभावू शकते.

1.नैराश्याचा आणि एंजायटीचा धोका कमी करते

2013 मधील रिसर्चमध्ये असे सूचित केले आहे की Extra Virgin Olive Oil मधील घटक मज्जासंस्थेचे रक्षण करण्यास मदत करू शकतात आणि म्हणूनच डिप्रेशन आणि Anxiety मध्ये ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरू शकते.

हायड्रॉक्सीटायरोसोल नावाचे द्रव्य ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळून येते जे एक दाहक-विरोधी प्रभाव सोडू शकते आणि रक्तवाहिन्या संकुचित होण्याचा धोका कमी करते. Reference

2.इंफ्लामेट्री बोवेल डिसीज

benefits of olive oil in marathi

इंफ्लामेट्री बोवेल डिसीज (आयबीडी) पाचन प्रक्रियेस जळजळ करते.  अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोहन रोग हे दोन इंफ्लामेट्री बोवेल डिसीजचे प्रकार आहेत.

2019 च्या एका विश्वसनीय अभ्यासात असे आढळले की ऑलिव्ह ऑईलमधील फिनॉल्स आतड्यांमधील सूक्ष्मजंतूंमध्ये बदल करून आतड्यांची प्रतिकारशक्ती आणि आतड्याचे आरोग्य वाढविण्यास मदत करतात. Reference

Olive Oil कोलायटिस आणि इतर प्रकारच्या आयबीडी रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते.  मात्र या निकालांची पुष्टी करण्यासाठी अधिक मानवी अभ्यास आवश्यक आहेत.

3.अल्झायम रोगामध्ये फायदेशीर

मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील संरक्षक प्रभावामुळे 2013 मध्ये काही शास्त्रज्ञांनी असे सुचवले की आहारात Extra Virgin Olive Oil चा समावेश केल्यास अल्झायम आजार रोखण्यास मदत होते.  

ऑलिव्ह ऑईल मेंदूची लक्षात ठेवण्याची शक्ती वाढवते व मेंदूतील रक्तप्रवाह देखील वाढवते म्हणूनच अल्झायम रोगामध्ये olive oil चे सेवन फायदेशीर ठरू शकते.अगदी अल्झायम नसलेल्या लोकांनी सुद्धा ऑलिव्ह ऑईल आहारामध्ये घालावा जेणेकरून म्हातारपणी अल्झायम रोगाचा धोका कमी होतो.

हा लेख वाचा – Avocado In Marathi एवोकाडो म्हणजे काय? 

4.वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर

ऑलिव्ह ऑइलमधील ओलिओकॅन्थाल द्रव्य वेदना कमी करण्याचा प्रभाव दर्शवितो.  संधिवात, संधीशोथ, हाडांचे दुखणे आशा आजारांमध्ये सतत वेदना होत असतात मात्र Olive Oil आहारामध्ये समाविष्ट केल्याने वेदना प्रभावीरित्या कमी होतात.

ऑस्टिओआर्थरायटीस ग्रस्त रूग्णांच्या गुडघ्यावर ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने वेदना कमी होतात.

अधिक वाचा :- ऑस्टिओआर्थरायटीस च्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

5.वजन कमी करण्यास मदत करते

benefits of olive oil in marathi

ऑलिव्ह ऑइलमध्ये ओलिक एसिड सारखे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसीड्स असतात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसीड्स आपल्या हृदयासाठी चांगले असतात आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास देखील मदत करतात.

ऑलिव्ह ऑइलने पोट भरल्याची भावना देखील उत्पन होते, ज्यामुळे आपल्याला कमी अधिक खाऊसे वाटत नाही व यामुळेच अतिरिक्त वजन कमी होते.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय म्हणून आहारात ऑलिव्ह ऑइल सोबत सोल्युबल फायबर चे समावेश करावे जशे की chia seeds, ragi , hemp seeds, खारीक यांचा समावेश करा.

हा लेख वाचा – Castor Oil In Marathi

6.चेहऱ्याच्या त्वचेवर फायदे

Olive Oil हे आपल्या त्वचेसाठी आश्चर्यकारक औषध आहे.  ऑलिव्ह ऑइल मधील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट निरोगी व सौंदर्य त्वचा टिकवून ठेवण्यास मदत करते.

ऑलिव्ह ऑइलचे त्वचेवर होणारे विविध परिणामः

 • त्वचा मॉइस्चराइझ करते
 • त्वचा साफ करण्यासाठी उत्तम पर्याय
 • मेकअप काढण्यासाठी वापरला जाऊ शकतो
 • चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या तयार होण्यास प्रतिबंधित करते
 • स्ट्रेस मार्क्स कमी करण्यास मदत करते
 • मुरुमांना प्रतिबंधित करते
 

7.पचनशक्ती वाढवते

ऑलिव्ह ऑईल आपल्या पाचन तंत्राला निरोगी ठेवते.  तसेच नियमितपणे आतड्यांसंबंधी हालचाल राखून बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.

8.मधुमेह चे व्यवस्थापन

ऑलिव्ह ऑईलमध्ये टायरोसोल नावाचा अँटीऑक्सिडेंट असतो. टायरोसोलमुळे इन्सुलिन रेसिस्टंस कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यापासून बचाव होतो.

प्रकार 2 मधुमेह मधील इन्सुलिनच्या मॅनेजमेंट साठी Olive Oil फायदेमंद आहे. Reference

9.केसांवर फायदे

 1. ऑलिव्ह ऑईल टाळूला हायड्रेट करून मुलायम बनवते ज्यामुळे  खाज सुटणे आणि कोरडेपणा कमी होतो.
 2. डोक्यातील कोंडा कमी करते.
 3. आपले केस निरोगी आणि चमकदार बनवते.
 4. केस गळणे कमी करते आणि प्रतिबंधित करते.
 5. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
 
अधिक वाचा :- Kes vadhavnyache upay आणि Silky hair tips in marathi
 

Types of Olive Oil In Marathi 

 

1.एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल / Extra Virgin Olive Oil In Marathi

Extra Virgin Olive Oil In Marathi

एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ऑलिव्हवर कोल्ड-प्रेसिंग ची प्रक्रिया करून बनविले जाते. हे अनरिफाईनेड तेल असते जे महाग आणि उत्कृष्ट स्वादिष्ट आहे. 

या प्रकारच्या तेलात अधिक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्ससह समृद्ध असतात.   हे उत्तम प्रतीचे आणि आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर प्रकारचे तेल आहे.

हा लेख वाचा – वजन कमी करण्याचे उपाय

2.व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल / Virgin Olive Oil In Marathi

 

व्हर्जिन ऑलिव ऑइल सुद्धा कोल्ड प्रेसिंग प्रक्रियेद्वारे प्राप्त केले जाते मात्र त्यात कमी ऍसिड असते.

हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आणि एक्सट्रा व्हर्जिन प्रकारांपेक्षा कमी खर्चिक आहे. याची चव आणि गंध चांगले आहे.

3.शुद्ध ऑलिव्ह ऑईल / Pure Olive Oil In Marathi

या प्रकारच्या नावाला जरी शुद्ध म्हटले जाते, परंतु वास्तविकपणे हे तेल व्हर्जिन आणि परिष्कृत तेलाचे मिश्रण आहे.  त्यात उच्च अ‍ॅसिडची मात्रा असते आणि हे तेल वापरता येत नाही.

हा लेख – वाचा लवकर व वेळेत मासिक पाळी येण्यासाठी उपाय

4.परिष्कृत ऑलिव्ह ऑईल / Refined Olive Oil

रिफाइंड ऑलिव्ह ऑइल कमी गुणवत्तेच्या ऑलिव्ह मधून हे तेल काढले जाते आणि नंतर त्यांना उष्णता, रसायने आणि गाळण्याद्वारे सेपरेट केले जाते. 

 

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो अशा करतो की हा लेख ‘olive oil in marathi’ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या ब्लॉग ला Subscribe करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here