-Advertisement-
Home पित्त कशामुळे होते पित्त झाल्यावर घरगुती उपाय – पित्तावर घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

पित्त झाल्यावर घरगुती उपाय – पित्तावर घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

2
1299
पित्त झाल्यावर घरगुती उपाय
पित्त झाल्यावर घरगुती उपाय
-Advertisement-

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय – लाखों लोकांना पित्ताचा व ऍसिडिटीचा त्रास असतो अगदी जगणे हराम करणारा हा आजार आहे, अनेक लोक औषधांचा वापर करतात मात्र दीर्घकाळ आशा औषधांचा वापर चांगला नसतो पुढे जाऊन त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, मात्र औषधांना पर्याय म्हणून ऍसिडिटी व पित्तावर घरघुती उपाय आहेत जे आपण आज खालील लेखामध्ये पाहणार आहोत.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय पाहण्याच्या अगोदर आपण पित्त काय असत हे पाहुयात जेणेकरून आपल्याला पित्तावरचे घरघुती उपाय समजण्यास अधिक मदत होईल

पित्त म्हणजे काय ? pitt in marathi

आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की मनुष्यामध्ये तीन दोष असतात जे सम्पूर्ण शरीराच्या सुरळीत वाटचालीसाठी महत्वपूर्ण असतात. हे तीन दोष म्हणजे वात, पित्त व कफ जेंव्हा हे तिनही दोष सुरळीत असतात तेंव्हा आशा माणसाला आयुर्वेदामध्ये निरोगी समजले जाते.

यातील पित्त म्हणजे अग्नी किंवा उष्णता होय, पित्ता मध्ये महाभूतांपैकील अग्नी चा समावेश आहे.

जेंव्हा पोटातील आम्लता वाढते तेव्हा पोटातील अन्न अन्ननलिकेमार्फत पुन्हा कंठापर्यंत येते ह्या प्रक्रियेमुळे व आम्ल पदार्थामुळे छातीत जळजळ व डोखेदुखी होते ह्याला पित्त असे म्हणतात.

पित्त कशामुळे होते / पित्त होण्याची कारणे

  1. एकदाच खूप खाणे किंवा जेवल्याजेवल्या आडवे होणे
  2. जास्त वजन किंवा लठ्ठपणा
  3. झोपायच्या आधी काही खाणे (चिप्स,फरसाण इत्यादी)
  4. आम्लता वाढवणारे पदार्थ खाणे ( लिंबू,टोमॅटो, चॉकोलेट, पुदिना,लसूण,कांदे किंवा तिखट पदार्थ)
  5. कारबन असलेले थंड पेये, दारू, कॉफी व चहा
  6. धुम्रपान
  7. गरोदरपणात देखील पित्त होते
  8. काही औषधे देखील पित्त होण्यास कारणीभूत आहेत जशी की (Azithromycin,Combiflam etc)
  9. पोटातील आजार जसे अल्सर, गॅस्ट्रो-ऑइसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) इत्यादी.
  10. खराब जीवनशैली जसे की जास्त ताण घेणे, कमी झोपणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे इत्यादी.

पित्त व आम्लपित्ताची लक्षणे (symptoms of acidity in marathi)

 
  1. छातीत व गळ्याच्या भागात जळजळ होणे
  2. अपचन
  3. पोटात गॅस होणे
  4. बद्धकोष्ठता
  5. आंबट ढेकर येणे
  6. उलटी होतेय असे वाटणे
  7. तोंडातुन घाण वास येणे

पित्ताचे प्रकार (types of acidity in marathi)

रिस्पायरेटरी ऍसिडोसिस पित्त

जेव्हा शरीर पुरेसे कार्बनडाय ऑक्साईड शरीरातून बाहेर काढण्यास असमर्थ होते व शरिरातील कार्बनची पातळी वाढते आणि त्यामुळे पोटातील ऍसिड देखील वाढते.

रिस्पायरेटरी ऍसिडोसिस पित्ताची लक्षणे 

  1. शिंका येणे
  2. श्वास घेण्यात अडचण
  3. अस्वस्थ झोप
  4. रक्तातील ऑक्सिजनच्या कमी पातळीमुळे त्वचेवर निळे रंग
 

आहार-प्रेरित ऍसिडोसि पित्त

काही पदार्थ आणि पेय शरीरात आम्लता वाढवू शकतात. पदार्थांचा पीएच पोटातील आम्लता वाढवत नाहीत मात्र पदार्थ पचन होत असताना प्रक्रियेत आम्लता वाढू शकते.
 

औषधांपासून होणारे पित्त (डायट इंडुसेड ऍसिडोसिस)

काही औषधे शरीरात आम्लता वाढवू शकतात यामध्ये उदाहरणांचा समावेश आहे:
बीटा-ब्लॉकर्स
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ औषधे, जसे की ट्रायमेथोप्रिम (प्रिमसोल)
अँटीरेट्रोव्हायरल
स्टॅटिन
 

रेनल ट्यूबुलर एसिडोसिस पित्त

मूत्रपिंडाचा रोग किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यास मेटाबोलिक एसिडोसिस होऊ शकते, 
मूत्रपिंड शरीरातील जादा ऍसिड काढून टाकते जे शरीरातून मूत्रमार्गे निघून जाते.  मूत्रपिंडात समस्या असल्यास, हे अवयव शरीरातून प्रभावीपणे एसिड काढण्यात अक्षम ठरतात.
Acidity Tablet / Medicine

पित्तावर घरघुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

पित्त झाल्यावर घरगुती उपाय – क्रमांक एक 

थोडेसे सुखे खोबरे घ्या व दोन ते तीन चमचे धनिया घ्या व त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व हे मिश्रण चावून चावून खाणे,
कमीतकमी सात ते आठ दिवस तुम्ही हे मिश्रण खाणे आवश्यक आहे व ज्याचे पित्त जास्त आहे त्यांनी जास्त दिवस हा उपाय करावा.
हे खाल्यानंतर पाच मिनिटांत तुमचे पित्त कमी झालेले तुम्हाला दिसून येईल.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय – क्रमांक दोन 

सुंठ घ्या व त्याची ठेचुन पूड तयार करा व थोडीसी साखर देखील घाला व थोडा ओलेपणा येईल एवढं पाणी घाला व एक चमचा सुंठेच्या पुडेची गोळी बनवून घ्या व त्याचे सेवन करा, हा एक पित्तावर रामबाण उपाय आहे.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

1.बडीशेप 

पित्तावर घरगुती उपाय

 

एक चमचाभर बडीशेपची पावडर घेऊन एक ग्लासभर पाण्यात घालून पिल्याने छातीत होणारी जळजळ त्वरित कमी होते 
हा लेख वाचा :- बडीशेप खाण्याचे फायदे

2.पपई

पपई मध्ये पॅपेन (Papain) नावाचे एंझाईम असतात जे पोटातील आम्लस्त्राव (Acid Secretion) रोखण्यास मदत करते.

पित्तावर घरगुती उपाय

ओवा शरीराची पाचन शक्ती वाढवतो ज्यामुळे अधिक खाल्लेलं अन्न पचनास मदत होते त्यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो व सोबतच पित्त देखील नाहीसे होते.
एक चमचा ओवा किंवा ओव्याचे पाणी घेतल्याने पित्त कमी होते.2

हा लेख वाचा :- benefits of ajwain in marathi | carom seeds in marath

लवंगाची एखादी तुकडी जरी तोंडात घेऊन चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे जशी की छातीतील जळजळ,उलटी व पोटातील त्रास लगेच कमी होतात.3
हा लेख वाचा :- लवंग खाण्याचे फायदे

5.पित्तनाशक केली

पित्तावर घरगुती उपाय

 

केली खाल्ल्याने पोटातील आम्लता कमी होते ज्यामुळे पित्त देखील कमी होते,
पित्त वाढल्यावर दोन केली खाल्ल्यास त्वरीत आराम पडतो.

6.कलिंगडाचा रस

पोटाला एकदम थंडता देणारा रस म्हणजे कलिंगडाचा रस, एक ग्लासभर रस पिल्याने चांगलाच आराम पडेल सोबतच पचनशक्ती देखील वाढते.
 

7.बेकिंग सोडा (पित्तावर घरगुती उपाय)

अर्धा चमचे बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यात मिसळुन त्याचे सेवन केल्यास, एसिडिटी आणि छातीत जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळतो.
 

8.आले/अद्रक

पित्तावर घरगुती उपाय

 

कच्चे आले किंवा आल्याचा चहा पिल्याने पोटातील आम्लता कमी होते व पित्तापासून आराम मिळतो.
 

9.थंड दूध

हा सर्वात सोपा उपाय आहे, कॅल्शियममध्ये समृद्ध असल्याने थंड दूध आपल्या पोटात आम्लीयतेची पातळी कमी करते व आपल्याला पित्तापासून झटपट आराम देते.
 

10.नारळाचे पाणी

दररोज 2 कप नारळाचे पाणी पिल्याने पित्त कमी होते तसेच नारळात फायबर जास्त प्रमाणात असल्याने अन्न पचन देखील चांगले होते.
 

पित्तावर घरगुती उपाय

बदाम नैसर्गिक तेलांमध्ये समृद्ध असल्याने आपल्या पोटात बदामांचा सुखद परिणाम होतो.  कच्चे बदाम पचन प्रक्रियेस मदत करणारे म्हणून ओळखले जातात,तसेच तुम्ही बदामाचे दूध देखील घेऊ शकता.
 
हा लेख वाचा :- बदाम तेलाचे फायदे मराठी

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्तापासून होणारी डोखेदुखी हा एक भयान अनुभव असतो जो फक्त होतो त्यालाच कळतो ह्यावर सोप्पे घरघुती उपयोग आहेत जे खाली दिले आहेत.
 
1.एक ग्लासभर दूध पिणे व लगेचच त्यावर एक चमचा कोथिंबीरिचा रस घेतल्याने डोकेदुखी त्वरित कमी होते
 
2.दालचिनीची पेस्ट

दालचिनी म्हणजे डोकेदुखीवर आणखी एक प्रभावी उपचार.  आपल्याला फक्त काही दालचिनीच्या काड्या घ्यायच्या आहेत व त्यांची पावडर बनवून घ्या आता जाड पेस्ट बनवण्यासाठी पाण्याचे थेंब घाला आणि मिक्स करा, ही पेस्ट तुमच्या कपाळावर लावा व 30 मिनिटे राहू द्या.  30 मिनिटांनंतर सामान्य पाण्याने धुवा.  डोकेदुखीपासून आराम मिळेल.

हा लेख वाचा :- anxiety meaning in marathi

तर मित्रहो आत्तापर्यंत आपण पित्तावर घरगुती उपाय बघितले आहेत ह्या व्यतिरिक्त काही दैनिक जीवनातील बदल सुद्धा पित्तावर घरगुती उपाय ठरू शकतात हे कोणते बदल आहेत हे खाली दिले आहेत.

  • जीवनात सक्रिय रहा आणि आशा गोष्टी करत राहा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यायाम होईल, जशे की पोहणे, सायकलिंग, डान्स किंवा आपला कोणताही आवडता खेळ.
  • दिवसातून 4 ते 5 वेळा थोडे थोडे जेवण खा.
  • जेवणानंतर लगेच झोपू नका
  • अंथरुणावर पडण्यापूर्वी किमान 2 तास आधी आपले जेवण खाऊन घ्या.
  • वजन जास्त किंवा लठ्ठपणा असल्यास वजन कमी करा
  • धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा
  • व्यायाम करणे
 
जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण आपल्या सर्व महत्वाच्या अवयवांकडे रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि यात पोट देखील समाविष्ट आहे.  जर पोटात अन्न असेल तर नियमितपणे व्यायाम करणार्‍या व्यक्तींना रक्तपुरवठा आणि पचन चांगले होते.  खरं तर, नियमित व्यायाम करणार्‍या लोकांमध्ये पोटाची हालचाल नियमित आणि वेगवान असते.

पित्त वाढवणारे पदार्थ टाळा

1.खूप मसालेदार आणि तेलकट पदार्थ
2.चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स
3.कच्चा कांदा,लसूण
4.लिंबू, संत्री, किवी यासारखे लिंबूवर्गीय फळे
5.टोमॅटो
6.जंक फूड इत्यादी
 
तर मित्रानो पित्तावर घरगुती उपाय हा लेख तुम्हाला कसा वाटला हे टिप्पणी करून कळवा किंवा तुम्ही  पित्तावर कोणता घरगुती उपाय करता हे देखील सांगा.
 
इतर लेख
-Advertisement-

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here