ओट्स हे पृथ्वीवरील एक आरोग्यदायी धान्य आहे, ओट्स मध्ये महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्सची मात्रा असते.
ओट्स हे एक युरोपियन व अमेरिकन भागातील पीक आहे, त्यासाठी ओलसर व थंड वातावरण लागते त्यामुळे हे पीक भारतात होत नाही व ओट्सला मराठी नाव नाही म्हणुन Oats ला मराठी मध्ये ओट्स असेच म्हणतात.
एव्हाना सॅटिवा असे ओट्सचे साइंटिफिक नाव आहे.
Oats वर केलेल्या संशोधनानुसार असे सांगितले जाते की Oats मध्ये अनेक पौष्टिक आहार असतात ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
यामध्ये वजन कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि हृदयरोगाचा धोका कमी होणे असे फायदे समाविष्ट आहे.