Benefits Of Fennel Seeds In Marathi – बडीशेप खाण्याचे फायदे

fennel seeds in marathi

 

Advertisements

fennel seeds in marathi – fennel seeds ला मराठीमध्ये काय बोलतात?

fennel seeds in marathi ला मराठीमध्ये बडीशेप असे म्हणतात अतिशय पौष्टिक अशी बडीशेप आरोग्यासाठी फायदेमंद आहे ह्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

बडीशेप ची पौष्टिकता आणि आरोग्यासाठी फायदे Fennel Nutrition Facts and Health Benefits

 

आपण आपल्या दैनंदिन जेवणानंतर रोज बडीशेप खातो तसेच भारतीय जेवणात देखील बडीशेपचा उपयोग केला जातो.

फोनिकुलम वल्गारे, असे बडीशेपचे साइंटिफिक नाव आहे व बडीशेपच्या झाडाला हिरव्या व पांढऱ्या रंगाची झुलफिदार पाने असतात, व पिवळ्या रंगाची फुले असतात मात्र फक्त बडीशेपच्या बिया खाण्यायोग्य असतात.

गोड व तिक्ष्ण अशी बडीशेपला चव असते ह्या व्यतिरिक्त बडीशेप शरीरासाठी पौष्टिक आहे बडीशेप मध्ये अनेक जीवनावश्यक तेल असतात.

आजच्या या लेखामध्ये आपण बडीशेप ची पौष्टिकता आणि आरोग्यासाठी फायदे बघणार आहोत.

हा लेख वाचा – Flax seeds in marathi

Nutritional Value Of Fennel Seeds In Marathi

एक कप बडीशेप (87 ग्रॅम) मध्ये खलील प्रमाणे पोषणतत्वे असतात.

Nutritional Value Of Fennel Seeds In Marathi

1.कार्बोहायड्रेट

बडीशेप मधील अर्ध्या पेक्षा जास्त कार्बोहायड्रेट फायबर मधून येते व उरलेले कार्बोहायड्रेट बडीशेपमधील साखरेतून येतात, बडीशेपची ग्लाइसेमिक इंडेक्स 16 आहे, कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहाचे रुग्ण देखील बडीशेप खाऊ शकतात.

2.फॅट्स

कच्या बडीशेप मध्ये खूप कमी प्रमाणात फॅट्स असतात, हे असलेले फॅट्स बडीशेपमधील फॅटी ऍसिड मध्ये असतात व  अधिकतम फॅट्स पॉलीअनसॅचुरेटेड असतात जे ह्रदयविकारांसाठी उपयोगी असतात.

3.प्रथिने

बडीशेपमध्ये फारसे प्रोटीन नसतात मात्र एका कप भरून बडीशेपमध्ये 1 ग्राम प्रथिने असतात.

4.जीवनसत्त्वे आणि खनिजे

बडीशेप पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, याशिवाय व्हिटॅमिन सी आणि फोलेटची मात्रा देखील उच्च असते.
बडीशेप मध्ये मॅंगनीज, क्रोमियम, तांबे, लोह आणि जस्त सारख्या आवश्यक खनिज पदार्थांची देखील मात्रा असते.

हा लेख वाचा – Chia seeds for weight loss in marathi

बडीशेपचे आरोग्याला फायदे Health Benefits Of Fennel In Marathi

Health Benefits Of Fennel In Marathi

जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या पलीकडे बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात, यासोबतच अतिआवश्यक फायटोन्यूट्रिएंट्स आणि फ्लेव्होनॉइड देखील असतात. 

1.कर्करोग रोखण्यास मदत करते

बडीशेपमध्ये चांगल्या प्रमाणात फ्लेव्होनॉइड असतात त्यासोबतच अनेथॉल देखील असते.एनेथॉल हा एक फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर आहे जो नुकसान झालेल्या पेशी कर्करोग होण्यापूर्वी नष्ट करतो. 

2.दातांची निगा राखते

 

बडीशेप खाल्याने दातांचे व तोंडातील पीएच संतुलन योग्य राहते व त्यामुळे दात दुखणे जाते आणि दातांना कीड देखील लागत नाही.

एका संशोधनात व अभ्यासात असे सांगितले आहे की बडीशेप 10 मिनिटे चघळल्याने थुंकी चे प्रमाण वाढते व तोंडातील पीएच देखील वाढते,
ज्यामुळे तोंडाचे आरोग्य सुरळीत राहते व दातांचे विकार देखील होत नाहीत.

 
 

3.बडीशेप हृदयरोगाचा धोका कमी करते

बडीशेप मध्ये फायबर व अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असते जे ह्रदयविकाराचे धोके कमी करते याचसोबत व्हिटामिन सी सुद्धा नायट्रिक ऍसिड चे प्रमाण वाढवते जे श्वासनलिका सुरळीत चालू ठेवते.

4.स्तनपान करण्यास समर्थन देते

पूर्वीपासून बडीशेपचा उपयोग महिलांच्या अंगावरचे दूध वाढवण्यासाठी केला जात आला आहे.

बडीशेप मध्ये असलेले अनेथॉल डोपामाईनला ब्लॉक करून दुधाचे उत्पादन वाढवते.

3.बडीशेप पचनशक्ती सुधारते

पारंपरिकरित्या बडीशेपला आतड्यातिल जळजळ कमी करण्यासाठी वापरली जात आहे, हळद व बडीशेप चे तेल 30 दिवस खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात व पचनशक्ती वाढते.

4.पित्तावर उपाय

जेवणानंतर Fennel Seeds (बडीशेप खाल्ल्याने) पोटातील ऍसिड कमी होते जेणेकरून पित्त कमी होते. 

जंक फूड व अतिरिक्त जेवण केल्याने पोटामध्ये अपचन, गैस, बद्धकोष्ठता सारखे पोटाचे आजार होतात अशावेळेस बडीशेप खाल्ल्याने या सर्व आजारांपासून मुक्तता मिळते.

 

5.मधुमेह मध्ये संरक्षण

 

बडीशेप मध्ये आवश्यक तेल आणि एनेथोल असते जे अचानक वाढणाऱ्या रक्तातील साखरेवर प्रतिबंध लावतो. बडीशेप व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, अँटिऑक्सिडेंट्स आणि आवश्यक खनिजांमध्ये समृद्ध असते जे इन्सुलिनची सेनसिटीव्हीटी सुधारते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते.

 

हा लेख वाचा :- मधुमेह रुग्णाचा आहार कसा असावा मराठीमध्ये

6.वजन कमी करण्यासाठी लाभदायी

बडीशेपला ग्रीक मध्ये “मॅरेथॉन” असे म्हणतात हा शब्द “मारिनो” वरून घेतला आहे ज्याचा अर्थ पातळ होणे आहे.चयापचय वर्धक म्हणून बडीशेप कार्य करते, चयापचय क्रिया ट्रिगर करते. चरबी कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार बडीशेपचा वापर भूक सामान्य करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो.

7.प्रजनन क्षमता वाढवते

 

बडीशेपमध्ये नैसर्गिकरित्या फायटोस्ट्रोजेनने समृद्ध असल्याने महिलातील मासिक पाळी आणि उत्तेजन देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

प्राचिन काळापासून  बडीशेपचा वापर मासिक पाळी नियमित करण्यासाठी, आणि रक्त प्रवाह सामान्य करण्यासाठी आणि प्रजननक्षमता वाढण्यासाठी केला जात आहे.

हा लेख वाचा – संधिवात व गुढगेदुखीवर रामबाण घरगुती उपाय

Side Effects Of Fennel Seeds in Marathi

 
1.गरोदर महिलांनी बडीशेप खाल्ल्याने बाळावर परिणाम होऊ शकतात
2.कर्करोगाच्या औषधांसोबत इंटरेक्शन होण्याची संभावना आहे, म्हणूनच आशा व्यक्तींनी बडीशेप खाऊ नये.
3.गर्भनिरोधक गोळ्या सोबत (Unwanted 72 Tablet) बडीशेप खाण्याने दूषप्रभाव होऊ शकतो.
4.काही मोजक्या लोकांना बडीशेप खाल्ल्याने एलर्जी होते.
 

हा लेख वाचा – Benefits of avocado in marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *