RIP Meaning in Marathi – RIP चा मराठीत अर्थ

rip meaning in marathi

rip meaning in marathi -याचा फुल फॉर्म रेस्ट इन पीस असा होतो, अर्थात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लागो असा याचा अर्थ होतो तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.

Advertisements

आजकल व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर एखादे जवळचे व्यक्ती मेल्यावर शोक व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा उपयोग केला जातो. आजच्या या लेखामध्ये Rip meaning in marathi या शब्दाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

Other rip meaning in marathi – RIP चे इतर अर्थ

 • फाडणे किंवा विभाजित करणे किंवा उघडणे
 • धान्य विभाजित करणे
 • तीव्र प्रकारे छिद्र करणे
 • धारदार उपकरणाने मारणे

Read – Crush meaning in marathi

RIP Full form in marathi

 • R = रेस्ट
 • I = इन
 • P = पीस

रेस्ट इन पीस असा RIP चा फुल फॉर्म होतो, ख्रिश्चन धर्मानुसार मेलेल्या माणसासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.

Rest in Peace Defination and Basic Information in Marathi

रेस्ट इन पीस (त्याच्या आत्म्यास शांती लागो) हा वाक्यांश सुरुवातीच्या ख्रिश्चनांच्या कॅटॅकॉम्ब्समध्ये आढळला आणि “ते चर्चच्या शांततेत मरण पावले, म्हणजेच ख्रिस्तामध्ये एकत्र झाले असा संदेश ख्रिश्चन लोक मानतात.

रेस्ट इन पीस या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्द रिक्वेस्केट इन पेस या शब्दापासून झाली आहे. कॅथॉलिक, लुथेरन, अँग्लिकन प्रकारच्या ख्रिश्चन परंपरेतील लोक आजही हा वाक्यांश मृत व्यक्तीच्या थडग्या वर लिहतात.

Read – Virgin meaning in marathi

Rest In Peace ला पर्यायी मराठी शब्द

 • भावपूर्ण श्रद्धांजली
 • आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
 • देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा
 • त्यांच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
 • तुमची आठवण सदैव येईल, ओम शांती

RIP Quotes in Marathi

“तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व जिवलग मित्र होतास. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढी मला तुझी आठवण येईल. RIP मित्रा!”

“आम्हा सर्वाना आशा आहे कि तुम्ही आमच्या अंतःकरणात रहाल, आणि मार्गदर्शन देखील कराल. आम्हाला तुमची खूप आठवण येते. RIP काका.”

“तुम्ही सदैव आमच्या आठवणीत रहाल, RIP [मृत व्यक्तीचे नाव]”

“ज्याने तुम्हाला आठवण ठेवण्यासाठी खूप काही दिले त्याला विसरणे खूप कठीण आहे, RIP अंकल , तुमची फार आठवण येते.”

“तुटलेल्या मनाने आणि दुःखाने, मला दररोज तुझी आठवण येईल. RIP माझ्या प्रिय मित्रा”

“आज मला मी माझा आनंद कायमचा गमावल्यासारखे वाटते. तुझ्याशिवाय मी कसे जगेन हे मला माहित नाही. RIP प्रिय …..”

“मला आशा आहे की देव तुम्हाला त्याच प्रेमाने आणि काळजीने स्वीकारेल जसे तुम्ही मला दिले. RIP काका”

“काहीही झाले तरी तुझी नेहमी आठवण येईल. तुझी उपस्थिती, प्रेम आणि दयाळूपणा सदैव आमच्यासोबत राहील. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो RIP मित्रा.”

Read – Meditation meaning in marathi

FAQ

RIP meaning in marathi?

rip meaning in marathi -याचा फुल फॉर्म रेस्ट इन पीस असा होतो, अर्थात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लागो असा याचा अर्थ होतो तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.

RIP वाक्याचा उपयोग कधी केला जातो?

मृत व्यक्तीसाठी भावनिक साद किंवा शोक व्यक्त करण्यासाठी RIP या शब्दाचा वापर केला जातो.

हिंदू व्यक्तीने RIP हा शब्द वापरावा का?

जरी हा शब्द ख्रिश्चन धर्मियांचा असला तरी हिंदू धर्म याचा विरोध करीत नाही ज्याला वापरावा वाटेल तो वापरू शकतो.

RIP या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता आहे ?

भावपूर्ण श्रद्धांजली किंवा आत्म्यास शांती लागो हे RIP शब्दाला सर्वोत्तम पर्यायी शब्द आहेत.

Read – Legend meaning in marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *