संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय
चिया सिड्स आणि फ्लेक्स बियाणे
या दोन्ही प्रकारच्या बियांना सुपरफूड्स मानले जाते, यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यासोबतच या दोन्ही बिया ओमेगा 3 फॅटी एसीड्स ने देखील असतात. या दोन्ही बियांचे सेवन केल्याने आतड्यातील जळजळ कमी होते आणि यातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात.
संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी एक चमचे चिया बियाणे एक कपभर पाण्यात 5 ते 10 मिनिटे भिजवा म्हणजे त्यातील फायबर मुले चिया सिड्स चांगल्याच फुगतील. मग यामध्ये 1 वाटी घोटलेले दही घाला आणि हे मिश्रण दिवसातून 4 वेळा सलग चार आठवडे घ्या तुम्हाला संडास साफ होईल.
पोट व संडास साफ होण्यासाठी सफरचंद आणि लिंबाचा रस
हे थोडे ऎकायला विचित्र वाटत असले तरी तुम्हाला सांगतो सफरचंद आणि लिंबाचा रस संडास साफ होण्यावर एक प्रभावी उपाय आहे.
एक कप सफरचंदचा रस घ्या, त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला आणि एक चमचा आल्याचा रस घाला.
कोमट गरम पाण्यात वरील मिश्रण मिसळा. पोट व संडास साफ होण्यासाठी आणि योग्य पचन प्रोत्साहित करण्यासाठी आपण हा घरगुती उपाय दिवसातून एकदा पिऊन पहा.
आल्याची कोरी चहा
संडास साफ होण्यासाठी उपाय म्हणून आले एक पर्यायी सोप्पा घरगुती उपाय आहे. यासाठी तुम्ही आल्याचा रस, चहा किंवा थेट आले खाऊ शकता.
एक कप गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस आणि मध मिसला आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा हे सेवन केले जाऊ शकते.
दीड कप पाणी उकळवा आणि त्यात एक चमचा चहा पाऊडर घाला नंतर त्यात एक इंच किसलेले आले घाला आणि चहा उकडून घ्या. पोट व संडास साफ होण्यासाठी आल्याची चहा दिवसातून 2 ते 3 वेळा प्या.
बडीशेप ओवा आणि जिऱ्याची पावडर
घरगुती, सोप्पा आणि प्रभावी असा हा उपाय नक्की करून पहा, या साठी अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घ्या.
वरील घेतले सर्व साहित्य मध्यम गरम तव्यावर भाजून घ्या ज्यामुळे त्यांची पाउडर लगेच बनेल. मग हे मिश्रण खलबत्ता किंवा पोळपाटावर बारीक करून घ्या. हे मिश्रण दिवसातून 3 वेळा खा याने तुमचे पोट आणि संडास साफ होईल.
मध आणि लिंबाचा उपाय
संडास व पोट साफ होण्यासाठी, 1 चमचा समान प्रमाणात मध, लिंबू आणि आल्याचा रस एकत्र करा. अपचनाविरुद्ध लढण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा या चाटनाचे सेवन करा तुम्हाला नक्की चांगला आराम मिळेल.
इसाबगोल
झोपेच्या वेळी घेतल्या जाणार्या 1 कप दुधात 2 चमचे इसाबगोल घालून पीने हे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे.
अजवाइन
अजवाइन हे सर्वोत्तम पाचक हर्ब्स पैकी एक आहे. नियमित सेवन करण्यासाठी काही अजवाइन बियाणे भाजून ते आपल्या पलंगाच्या किंवा जेवणाच्या टेबलाशेजारी बाटलीत ठेवा आणि रोज जेवण झाल्यावर एक चिमूटभर भाजलेले अजवाइन चघळा. हे अपचन पोटातील गैस आणि संडास साफ होण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.
कोरफड
जर तुमच्या बाल्कनी मध्ये किंवा घरच्या गार्डनमध्ये कोरफड असेल तर नक्कीच तिचा वापर करा.
कोरफडची एक छोटी फांदी घ्या व त्यातील रस काढून घ्या आणि थोड्या पाण्यात मिसळून कमीत कमी एक ग्लास याचे सेवन करा. तुमचे पोटाचे विकार लगेचच थांबतील आणि तुम्हाला संडास देखील साफ होईल.
तुळशीची पाने
तुळस सहज 100% लोकांच्या घरी असते ज्यामुळे हा उपाय सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यांना जमेल असा आहे.
रोज सकाळी उठल्यावर तुळशीची दोन पाने खावीत याने तुमचे पचन चांगले होईल आणि पोटात गैस देखील बनणार नाही.
हिंग पावडर
उबदार कोमट एक ग्लास पाण्यात एक चमचा हिंग मिसळा आणि प्या, हा उपाय दिवसातून एकदा पण सलग 3 दिवस करा बघा तुमचे पाचन सुधारेल आणि पोट व संडास साफ होईल.
मिठाचे पाणी
आपण खारट पाण्यातील फ्लश देखील वापरुन पाहू शकता. विशेषत: बद्धकोष्ठता आणि संडास साफ न होणाऱ्या लोकांना याची शिफारस केली जाते.
2 चमचे मीठ कोमट पाण्यात मिसळा. समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ वापरण्याची शिफारस केली जाते. रोज सकाळी खाण्यापूर्वी हे पाणी प्या. तुमचे पोट साफ होईल.
प्रोबायोटिक्स
आहारात प्रोबायोटिक्स जोडणे हा पोट साफ करण्याचा आणखी एक उपाय आहे. हे देखील इतर अनेक प्रकारे एकंदर पोटाच्या आरोग्यास चालना देते.
प्रोबियोटिक सप्लीमेंट्स घेऊन आपण अधिक प्रोबायोटिक्स मिळवू शकता. तसेच दही, किमची, लोणचे आणि इतर आंबलेले पदार्थ यासारखे बरेच पदार्थ आहेत त्यात प्रोबियोटिक असते.
प्रोबायोटिक्स फायबर आणि प्रतिरोधक स्टार्चच्या मदतीने आतड्यात चांगले बॅक्टेरिया आणतात. ज्यामुळे चांगले पाचन होते आणि पोट साफ होण्यास मदद होते.
दालचिनी
दालचिनीमध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे पचन होण्यास मदत होते आणि पाचक सिस्टीम मधील गडबड आणि नुकसान होण्याचा धोका कमी होते.
- युजेनॉल
- दालचिनी
- लिनालूल
- कापूर
हे अँटीऑक्सिडंट्स पाचन व पोट आणि संडास साफ करण्यासाठी मदद करतात.
लवंग
लवंगामध्ये असे पदार्थ असतात जे पोटात गॅस कमी करण्यास आणि जठरासंबंधी स्राव वाढविण्यास मदत करतात. हे कमी पचन वेगवान करू शकते, ज्यामुळे दबाव आणि पेटके कमी होऊ शकतात. लवंगामुळे एसीडीटी आणि उलट्या कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.
ज्येष्ठमध
लिकोरिस रूटमध्ये असे पदार्थ असतात ज्यामुळे जठराची सूज किंवा पोटातील अस्तर दाह , तसेच पेप्टिक अल्सरशी संबंधित जळजळ कमी होते.
अस्वस्थ पोटात एखादी व्यक्ती लक्षणे सुधारत नाही तोपर्यंत दिवसातून बर्याचदा लिकोरिस रूट टी पिण्याचा प्रयत्न करु शकते.
पोट साफ करण्यासाठी दिवसातून बर्याचदा लिकोरिस रूट टी पिण्याचा प्रयत्न करा.