PCOD Meaning in Marathi – पीसीओडी ची संपूर्ण माहिती | pcod in marathi

PCOD meaning in marathi

PCOD Meaning in Marathi – PCOD in Marathi

Advertisements

pcod meaning in marathi – पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये PCOD असे म्हणतात यालाच पॉली सिस्टीक ओव्हरी डिसीज असे देखील संबोधले जाते.

PCOD हा एक हार्मोनल आजार आहे जो 12 ते 45 या वयोगटातील 5 ते 10 टक्के मुलींना व स्त्रियांना हा आजार होतो.

बर्‍याच स्त्रियांना PCOD हा आजार असतो परंतु हे त्यांना माहित नसते.  एका रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जवळपास 70 टक्के PCOD झालेल्या महिलांना त्यांना PCOD आहे हे माहिती न्हवते. Reference 

Advertisements

PCOD महिलेच्या अंडाशयावर परिणाम करते, महिलांचे प्रजनन अवयव जे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करतात हे अशे हार्मोन्स आहेत जे मासिक पाळीचे सुरळीत चालू ठेवतात.

महिला थोड्याप्रमाणात अंडाशयामध्ये एंड्रोजेन नावाच्या पुरुष हार्मोन्सची देखील निर्मिती करतात.

अंडाशय एखाद्या माणसाच्या शुक्राणूद्वारे फलित होण्यासाठी अंडी सोडतात.  प्रत्येक महिन्यात अंडी सोडण्यास ओव्हुलेशन म्हणतात.

Advertisements

प्रत्येक महिन्याला ओव्हुलेशन च्या प्रक्रियेत महिला ओव्हरीमध्ये अंडी देतात, ही अंडी जर पुरुषांच्या शुक्राणूला जोडली गेली तर बाळ जन्माला येते मात्र जर असे नाही झाले तर मासिक पाळी येते. म्हणूनच मासिक पाळी न येणे हे एक गरोदरपणाचे लक्षण आहे.

 
 

फॉलिकल स्टीमुलेटिंग हार्मोन (FSH) आणि ल्युटेनिझिंग हार्मोन (LH), जे पिट्यूटरी ग्रंथीमध्ये तयार होतात,ल व हेच हार्मोन ओव्हुलेशन नियंत्रित करतात.

फॉलिकल स्टीमुलेटिंग हार्मोन (FSH) अंडाशयाला उत्तेजित करते आणी अंड्याची थैली निर्माण करते ल्युटेनिझिंग हार्मोन (LH) अंडाशयाला परिपक्व अंडी सोडण्यासाठी निर्देशन करते.

Advertisements

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज आजाराच्या नावामध्येच याचा अर्थ आहे, “पॉलीसिस्टिक” या शब्दाचा अर्थ आहे “अनेक सिस्ट्” 

महिलांच्या पिशव्यामध्ये प्रत्यक्षात फोलिकल्स असतात, मात्र PCOD मुळे ही अंडी अपरिपक्व रुपात राहतात कारण ओव्हुलेशन होत नाही, सोप्या भाषेत सांगायचे तर मासिक पाळी येत नाही.

Advertisements

ओव्हुलेशनचा अभाव इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, FSH आणि LH पातळीत बदल करतो.  प्रोजेस्टेरॉनची पातळी नेहमीपेक्षा कमी होते, तर पुरुषांच्या हार्मोनची अ‍ॅन्ड्रोजनची पातळी समान्यपेक्षा जास्त होते.

अतिरिक्त पुरुष हार्मोन्स मासिक पाळीमध्ये व्यत्यय आणतात, म्हणून पीसीओएस/पीसीओडी असलेल्या महिलांना नेहमीपेक्षा कमी मासिक पाळी येते.

थोडक्यात (pcod in marathi)

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) जवळजवळ सुमारे 27 टक्के स्त्रियांना त्यांच्या बाळ देण्याच्या वयामध्ये प्रभावित करतो.  या आजारात अंडाशयामध्ये सिस्ट, पुरुषांचे हार्मोन्स महिलेच्या शरीरात उच्च प्रमाणात वाढतात आणि अनियमित मासिक पाळी येते.

Advertisements

Symptoms of pcod meaning in marathiकाही स्त्रियांमध्ये त्यांची पहिली मासिक पाळी हुकल्यावर लक्षणे दिसू लागतात.  तर इतर स्त्रियांना त्यांचे वजन वाढल्यानंतर किंवा त्यांना गर्भवती होण्यास त्रास झाल्यावरच त्यांच्याकडे PCOD असल्याचे समजते.

Advertisements

PCOD असलेल्या सर्वच महिलांमध्ये सर्वच लक्षणे सारखी दिसतात असे नाही प्रत्येक स्त्रीला वेगवेगळी सौम्य ते तीव्र लक्षणे दिसू शकतात.

PCOD ची सर्वात सामान्य लक्षणे आहेतः

1.अनियमित मासिक पाळी

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) असलेल्या महिलांमध्ये ओव्हुलेशन बंद होते, याचाच अर्थ आशा महिला दर महिन्याला अपरिपक्व असलेली अंडी बाहेर सोडण्यात निकामी होतात, ज्यामुळे मासिक पाळी येत नाही.

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज असलेल्या महिलांना वर्षातून आठपेक्षा कमी महिन्यात मासिक पाळी येत नाही, हे एक सांकेतिक लक्षण आहे.

Advertisements

2.जोरदार व अतिरिक्त रक्तस्त्राव

PCOD झालेल्या महिलांमध्ये गर्भाशयाचा अस्तर दीर्घकालीन मासिक पाळीसाठी तयार होतो, म्हणून पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज मध्ये आलेल्या मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्त्राव होतो व अधिक वेदना देखील होऊ शकतात.

 
 

मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव या स्थितीला मेनोरेजिया असे म्हणतात, 7 दिवस किंवा याऊन जास्त दिवस मासिक पाळी राहणे हे मेनोरेजिया चे प्रमुख लक्षण आहे.

Advertisements

सामान्य मासिक पाळीत साधारणत: 40 मिलीलीटर रक्त व्हाहते. मात्र मेनोरेजिया असलेल्या स्त्रियांमध्ये 80 मिलीलीटरहून अधिक रक्‍त व्हाहून जाऊ शकते.

बऱ्याच वेळेला महिला असा विचार करतात की मासिक पाळीमध्ये जोरदार व अतिरिक्त रक्तस्त्राव हे स्त्री असल्याने सामान्य आहे परंतु असे नसते, या मागे एखादा आजार लपलेला असतो.
 

3.चेहरा व त्वचेवर केस उगवणे

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) असलेल्या 70 टक्के महिलांमध्ये चेहरा व त्वचेवर किंवा पाठीवर व छातीसह पोटावर देखील केस उगवतात.

स्त्रिया त्यांच्या अंडाशयामध्ये अडचणींमुळे उच्च अंड्रोजेन तयार करू शकतात, PCOD झालेल्या महिलांमध्ये पुरुष हार्मोन्स अँड्रॉजन हे अधिक होतात ज्यामुळे चेहरा व त्वचेवर केस उगवतात.

Advertisements

4.पुरळ/मुरूम

पीसीओडीची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे एंड्रोजेन नावाचे हार्मोन्सची उच्च पातळी.  मेडीकल भाषेत याला हायपरअँड्रॉजेनिसम असे  म्हणतात.

PCOD मुले वाढलेल्या पुरुष हार्मोन्समुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक चिकट होते आणि चेहरा, छाती आणि पाठीच्या वरच्या भागावर पुरळ येऊ लागतात.

PCOD असलेल्या महिलांमध्ये विस्तृत लक्षणे आणि आजाराची चिन्हे दिसू शकतात. मात्र यामध्ये मुरुमांचा त्रास हा सामान्य आहे, PCOD असलेल्या 10-34% स्त्रियांना मुरूम हमखास दिसून येतात.

Advertisements

हा लेख वाचा – Ovulation Meaning In Marathi

5.वजन वाढणे

पीसीओडी असलेल्या 80 टक्के स्त्रियांचे वजन वाढते किंवा लठ्ठपणा होतो. Reference

Advertisements

पीसीओडी शरीरात इन्सुलिन हार्मोन वापरणे अधिक अवघड करते, जे सामान्यत: शुगर आणि स्टार्चपासून अन्नातील उर्जा परिवर्तीत करण्यास मदत करते.

इंसुलिनचे उच्च प्रमाण एंड्रोजेन नावाच्या पुरुष हार्मोन्सचे उत्पादन वाढवते.  अँड्रोजनची उच्च पातळी वजन वाढीस कारणीभूत ठरते व लठ्ठपणा होतो.

6.पुरुषांसारखे टक्कल पडणे

PCOD मध्ये केस गळण्यासाठी पुरुषांचा हार्मोन एंड्रोजन कारणीभूत असतो, पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज (PCOD) मध्ये जास्तीचे अँड्रोजेन टाळूवरचे केस पातळ करतात.  मात्र, पुरुषांसारखे संपूर्ण टक्कल महिलांमध्ये होत नाही.

Advertisements

7.त्वचा काळी पडणे

त्वचेवर काळे किंवा ब्राऊन गडद रंगाचे पॅच पडतात, सामान्यतः हे पॅच मानेवर किंवा स्थनांच्या खाली आढळून येतात.

पीसीओडी असलेल्या ज्या स्त्रिया इन्सुलिन रेसिस्टंस विकसित करतात आशा महिलांना हा त्रास होतो.

अंडरआर्म आणि कॉलर भागात काळ्या किंवा जांभळ्या मखमली पोत सारख्या दिसणारे पॅच तयार होतात.

Advertisements

हा लेख वाचा – मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे 

8.डोकेदुखी

पीसीओडी असलेल्या 70% महिलांमध्ये डोकेदुखी आढळून येते, याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील असामान्य हार्मोन्स ची पातळी.

Advertisements
 

थोडक्यात PCOD ची सर्वात सामान्य लक्षणे – Symptoms Of PCOD in Marathi

पीसीओडी मासिक पाळीमध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे पुरुष हार्मोन अँड्रॉजन ची पातळी वाढते व मुरुम, त्वचेवर केसांची वाढ, वजन वाढणे आणि त्वचेवर गडद रंगाचे पॅच दिसतात ही  PCOD ची सामान्य लक्षणे आहेत.

पीसीओडी आपल्या शरीरावर कसा परिणाम करते? How PCOD Affect Women’s Body In Marathi

How PCOD Affect Women's Body In Marathi

1.वंध्यत्व

गर्भवती होण्यासाठी, महिलेला स्त्रीबीज होणे आवश्यक आहे.  ज्या स्त्रिया नियमितपणे ओव्हुलेट होत नाहीत आशा स्त्रिया गर्भवती होण्याइतपत अंडी सोडत नाहीत पीसीओडी मध्ये ओव्हूलेशन होत नाही म्हणूनच PCOD हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे

Advertisements

2.मेटाबोलिक सिंड्रोम

पीसीओडी असलेल्या 80 टक्के स्त्रियांचे वजन जास्त असते किंवा त्यांना लठ्ठपणाची समस्या असते, लठ्ठपणा आणि पीसीओएस दोन्ही खालील समस्येचा धोका वाढवतात:

  1. उच्च रक्तातील साखर
  2. उच्च ब्लड प्रेशर
  3. चांगले कोलेस्टेरॉल कमी करते
  4. वाईट कोलेस्टेरॉल वाढवते
 

या सर्व समस्येमुळे ह्रदयरोगाचा धोका वाढतो, यामुळे मधुमेह व हर्ट अटॅक अधिक येतात.

 
 

Advertisements

3.स्लीप एपनिया

या अवस्थेमुळे रात्रीच्या वेळी श्वासोच्छ्वास वारंवार बंद होतो, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो.

जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये स्लीप एपनिया अधिक सामान्य आहे – विशेषत: जर त्यांना पीसीओडी असेल तर.  स्लीप एपनियाचा धोका पीसीओडी नसलेल्यांपेक्षा लठ्ठपणा आणि पीसीओडी असलेल्या स्त्रियांमध्ये 5 ते 10 पट जास्त आहे.

4.एंडोमेट्रियल कर्करोग

ओव्हुलेशन दरम्यान, गर्भाशयाच्या अस्तर पातळ होतात.  आपण दरमहा ओव्हुलेट न केल्यास हेच अस्तर अधिक जाड होते.

Advertisements
गर्भाशयाच्या याच जाड अस्तर मुळे एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका वाढतो.

5.डिप्रेशन व एंजायटी

हार्मोनल बदल आणि अवांछित केसांच्या वाढीसारखी लक्षणे आपल्या भावनांवर नकारात्मक परिणाम करू शकतात.  पीसीओडी असलेल्या बर्‍याच जणांना अखेरीस नैराश्य आणि चिंता येते.

हा लेख वाचा – मासिक पाळी येण्याच्या गोळ्या 

पीसीओडीचे निदान कसे होते – Diagnosis Of PCOD In Marathi

Diagnosis Of PCOD In Marathiखालील तीन लक्षणांपैकी कमीतकमी दोन लक्षणे असलेल्या महिलांमध्ये डॉक्टर पीसीओडीचे निदान करतात.

Advertisements
  1. उच्च एंड्रोजनची पातळी
  2. अनियमित मासिक पाळी
  3. अंडाशय मध्ये अल्सर
 

चेहऱ्यावर मुरुम,त्वचेवर केसांची वाढ आणि वजन वाढणे अशी लक्षणे आहेत का हे आपले डॉक्टरांनी विचारू शकतात.

पेल्विक एक्साम आपल्या अंडाशयात किंवा आपल्या प्रजनन  मार्गाच्या इतर भागाशी संबंधित समस्या आहेत का हे शोधू शकते.  

Advertisements
या चाचणी दरम्यान, डॉक्टर आपल्या योनीत हातमोजे घालून बोट घालून तपासणी करतात यामध्ये ते आपल्या अंडाशय किंवा गर्भाशयाच्या कोणत्याही वाढीची तपासणी करतात.

या शिवाय रक्त चाचण्यांमध्ये पुरुष हार्मोन्सच्या पातळीची तपासणी केली जाते.

अल्ट्रासाऊंड  सोनोग्राफी आपल्या अंडाशय आणि गर्भाशयामध्ये असामान्य फोलिकल आणि सिस्ट आहेत का हे तपासतात.

डॉक्टरांना कधी भेटावे – When to seek doctor’s help in PCOD Marathi

आपल्या डॉक्टरांना भेटा जर:

Advertisements
  1. आपल्याला मासिक पाळी येत नाही आणि गरोदर राहण्यास व्यत्यय येत आहे.
  2. पीसीओएसची लक्षणे दिसत आहेत, जसे की चेहर्‍यावर आणि शरीरावर केसांची वाढ, वजन वाढणे इत्यादी.
  3. आपण 12 महिन्यांहून अधिक काळ गर्भवती होण्यासाठी प्रयत्न करीत आहात परंतु गर्भवती होत नाहीत.
  4. आपल्याला मधुमेहाची लक्षणे आहेत, जसे की जास्त तहान किंवा भूक, अस्पष्ट दृष्टी.
 

जर तुम्हाला मासिक पाळी आधीपासूनच अनियमित किंवा अनुपस्थित असेल आणि आपण गर्भवती होण्याचा प्रयत्न करीत असाल तर, डॉक्टरांना भेटण्यासाठी 12 महिने थांबू नका. ताबडतोब डॉक्टरांना भेटा व यावर उपचार करा.

पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीजचा सामान्य वैद्यकीय उपचार – Medicine Treatment For PCOD In Marathi

Medicine Treatment For PCOD In Marathi

Advertisements

गर्भ निरोधक गोळ्या आणि इतर औषधे मासिक पाळी नियमित करण्यास आणि केसांची वाढ आणि मुरुमांसारख्या पीसीओएस लक्षणांवर उपचार करू शकतात.

1.गर्भ निरोधक गोळ्या

दररोज प्रोजेस्टिन घेतल्याने:

  1. शरीरातील हार्मोन्सची पातळी सामान्य ठेवणे
  2. ओव्हुलेशनचे नियमित करणे
  3. त्वचेवर केसांची जास्त वाढ होण्यासारख्या लक्षणांपासून मुक्तता
  4. एंडोमेट्रियल कर्करोगापासून संरक्षण करते

2.मेटफॉर्मिन

मेटफॉर्मिन प्रकार 2 मधुमेहाचा उपचार करण्यासाठी वापरली जाणारी एक औषध आहे.  हे इंसुलिनची पातळी सुधारून पीसीओडीवर देखील उपचार करते.

Advertisements

एका रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की आहार आणि व्यायामामध्ये बदल सोबत मेटफॉर्मिन घेतल्याने वजन कमी होते, रक्तातील साखर कमी होते व मासिक पाळी सामान्य होते.

3.क्लोमीफेन

क्लोमीफेन (क्लोमिड) एक प्रजनन औषध आहे ज्यामुळे पीसीओडी असलेल्या महिलांना गर्भवती होण्यास मदत होते.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की आपण कौटुंबिक नियोजनाबद्दल चर्चा करीत असताना, हे लक्षात ठेवा की क्लोमीफेन जुळे आणि इतर अनेक जन्मांची शक्यता वाढवते.

Advertisements

अशाप्रकारे आजचा हा आपला लेख “pcod meaning in marathi” इथेच संपउयात आशा आहे की तुम्हाला सर्व माहित मिळाली असेल, जर तुम्हाला “pcod in marathi” बद्दल कुठला प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून विचारा.

Advertisements

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *