Salmon Fish Name In Marathi?
Salmon माशाला मराठी मध्ये आपण रावस मासा असे म्हणतो, अतिशय चविष्ट असलेला हा मासा मुंबई व कोकणात फार खाल्ला जातो सध्या अनेक लोक रावस माशाच्या शेती व्यवसायात देखील उतरले आहेत.
रावस मासा शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी असतो व अनेक रोगांपासून संरक्षण देतो, आपल्या आजच्या ह्या लेखामध्ये आपण रावस बद्दल सर्व माहिती घेऊयात. (salmon fish information in marathi)
रावस माशाची पौष्टिक माहिती (Nutritional Information of Salmon In Marathi)
- २३२ कॅलरी
- २५ ग्राम प्रोटीन
- १४.६ ग्राम फॅट
- २.८ ग्राम अनसॅचुरेटेड फॅट
Health Benefits of Salmon fish In Marathi
जितका चवीला तितकाच शरीराला पोषक असा हा मासा आहे खाली रावस माशाचे फायदे दिले आहेत.
1.omega 3 fatty acid salmon fish in marathi
रावस माशांमध्ये ओमेगा-३-फॅटी ऍसिड चे प्रमाण भरपूर असते. १०० ग्राम रावस माशामध्ये जवळपास ३ ग्राम ओमेगा-३-फॅटी ऍसिड आढळून येते.
ओमेगा-३-फॅटी ऍसिड हे शरीराला लागणारे खूप महत्वपूर्ण घटक आहे मेंदू , डोळे व स्किन साठी खूप लाभदायक असे ओमेगा-३-फॅटी ऍसिड आहे तसेच शरीराची सम्पूर्ण हेल्थ सुध्दा टिकऊन ठेवते.
हृदयविकार,सांधेदुखी कमी करण्यासाठी ओमेगा-३-फॅटी ऍसिड चा वापर केला जातो त्यामुळे रावस मासा खाणे अति आवश्यक आहे.
2.high in protein salmon fish in marathi
ओमेगा-३-फॅटी ऍसिड सारखाच अजून एक महत्वाचा घटक जो आपल्याला जेवणातून घ्यावा लागतो तो म्हणजे प्रोटीन, रावस मासा प्रोटीन ने भरपूर असतो १०० ग्राम माशामध्ये जवळपास 25 ग्राम प्रोटीन असते.
प्रोटीन शरीरातील अनेक कार्यासाठी आवश्यक असते, जशे एखादी इजा झाल्यावर तिला बरी करण्यासाठी, शरीरातील मास मसल्स मजबूत ठेवण्यासाठी व हाडांची निगा राखण्यासाठी असा प्रोटिनचा उपयोग होतो.
३.व्हिटामिन बी (high source of vitamin B)
ही जीवनसत्त्वे आपल्या शरीरातील बर्याच महत्वाच्या प्रक्रियेत सामील असतात, जशे की आपण खाल्लेले अन्न उर्जेमध्ये बदलणे व डीएनए तयार करणे आणि दुरुस्ती करणे अशी अनेक प्रक्रियेसाठी व्हिटामिन बी आवश्यक असते.
विटामिन बी शरीरातील अनेक महत्वपूर्ण कार्यांसाठी आवश्यक आहे जसे कि शरीरातील आहार ऊर्जेमध्ये बदलने, शरीरातील डीएनए दुरुस्त करणे व शरीरातील दाह कमी करणे ज्यामुळे ह्रदयविकार कमी होतात. Reference
वाचा – Vitamin D Foods In Marathi
4.रक्तदाब कमी करते
रावस मासा ओमेगा-३-फॅटी ऍसिड ने भरपूर असल्याने हा मासा खाल्ल्याने कोलेस्टेरॉल सामान्य राहते. ओमेगा-३-फॅटी ऍसिड वाढलेलं रक्तदाब कमी करतात.
5.वजन कमी करण्यासाठी उपयोगी
रावस मासा प्रोटीन ने भरपूर असतो व त्यातील चरबीचे प्रमाण खूप कमी असते रावस ची चरबी सम्पूर्ण मशामध्ये सामावलेली असते त्यामुळे रावस खाल्ल्याने तुमच्या शरीराला पुरेसे जीवन आवश्यक तत्वे मिळतात व चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
6.मेंदूला बळ देते
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे कि रावस मासा मेंदूच्या स्वस्था साठी सर्वात उपयोगी मानला गेला आहे.
यामध्ये असणारे फॅटी फिश ऑइल गरोदर पनात बाळाचे मेंदू प्रबळ करते तसेच Anxiety मध्ये चिंता कमी करण्याचे काम देखील Salmon fish in marathi करते. Reference
7.शरीरातील जलजळ कमी करते
अनेक संशोधनात असे नमूद केले आहे कि रावस मासा खाल्याने स्वयंप्रतिरोधक रोगांचा धोका कमी होते आणि त्यासोबतच शरीरातील जळजळ कमी होते.
या रिसर्चमध्ये असे नमूद केले कि ६५ वर्षीय लोकांनी आठवड्यातून २ वेळा फॅटी फिश ऑइल खाल्ले ज्यामुळे वयानुसार होणाऱ्या मेमरी लॉस मध्ये कमतरता आली.
8.अँटिऑक्सिडंट्स चा भरपूर स्रोत
रावस माशामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, प्रामुख्याने अस्थाझिंथिन नावाचे अँटिऑक्सिडंट ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
अस्थाझिंथिन ह्रदयविकाराचा धोका कमी करते कारण ते शरीरातील खराब कोलेस्टेरॉल ची पातळी कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉल ची पातळी सामान्य करते. Reference
रावसचे इतर फायदे थोडक्यात (Benefits of Salmon Fish In Marathi)
- स्मरणशक्ती वाढते
- शरीरातील दुखणे कमी करते
- निरोगी त्वचा राखण्यासाठी उपयुक्त
- ह्रदय विकारांवर मात करते
वाचा – Apricot In Marathi
Salmon fish name In Other Indian Languages
- हिंदी – रावस Salmon In Hindi – Ravas
- मराठी – रावस Salmon fish In Marathi – Ravas
- तेलगू – मगा Salmon In Telugu – Maga
- तमिळ – कीलांगण Salmon In Tamil – kilangaan
- गुजराती – रमस Salmon In Gujarati – Ramas
- मलयालम – कोरा/काला Salmon In Malayalam – Kora/Kala
रावस फ्राय रेसिपी (Recipe of salmon fish in marathi)
मेरीनेशन साहित्य
- १ किलो रावस बारीक कापलेला
- २ चमचे आलं लसूण पेस्ट
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा हळद
- मीठ चवीनुसार
- २ चमचा चिंचेचे पाणी किंवा कोकम
वरील दिलेलं सर्व रावस माशाला लावून मेरीनेट करावे कमीत कमी १० मिनिटे हे मिश्रण लावून बाजूला ठेवावे
वाचा – Castor Oil In Marathi
फ्राय करण्यासाठी साहीत्य
- पाव किलो तांदळाचे पीठ
- पाव किलो रवा
- २ चमचे लाल मिरची पावडर
- १ चमचा हळद
- थोढीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- वरील दिलेलं सर्व साहित्य मिक्स करा व त्यात मेरीनेट केलेला रावस माशाची तुकडी घालून तिला पूर्ण पिठामध्ये कव्हर करून घ्या व तशीच कव्हर केलेली रावसची तुकडी गरम तेलामध्ये फ्राय करा.
- साधारण पाच ते सहा मिनिटांत ही रेसिपी बनून तयार होते.
तर मित्रांनो हा salmon fish in marathi लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा व रावस माशा बद्दल तुम्हाला अजून काही माहीत असेल तरीही तुम्ही कमेंट करू शकता व तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरीही आम्हाला कळवा,धन्यवाद.
वाचा – Thyroid Symptoms In Marathi
आपले इतर लेख वाचा
FAQ Of Salmon Fish In Marathi
सालमन मासा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मासा आहे ज्याला मराठी मध्ये रावस मासा असे म्हटले जाते.
सालमन मासा भारतात उपलब्ध नाही कारण तो मूळचा भारतीय उपखंडातील नाही. म्हणूनच, आपण आपल्या स्थानिक बाजारात रावस मासा शोधू शकता ज्याला भारतीय सालमन म्हणून ओळखले जाते.
माशाची गुणवत्ता, ताजेपणा, आकार आणि स्थानिक उपलब्धतेनुसार भारतीय सालमन मासे ₹ 600 ते ₹ 1200 प्रति किलो पर्यंत मिळतात. युरोपीयन व्हेरिएंट (मूळतः सॅल्मन म्हणून ओळखले जाते) जे अत्यंत मौल्यवान आहे भारतीय बाजारात उपलब्ध नाही.
बांगडा, मांदेली,हलवा हे खायला एकदम चविष्ट मासे आहेत जे तुम्ही सालमन ऐवजी खाऊ शकता.
तुम्हाला रावस मासा मुंबई,रत्नागिरी,रायगड,पुणे,ठाणे या शहरात ताज्या रूपात मिळू शकतो.
अमिनो एसीड्स चा उत्तम स्रोत
प्रोटीन चा उत्तम स्रोत
बी जीवनसत्त्वे जास्त असतात
पोटॅशियमचा चांगला स्रोत
सेलेनियम ने भरपूर
ह्रदयाचे विकार कमी करते