देव रवळनाथ – The Guardian Deity



Advertisements

कोकणात अतिवृष्टी, वादळ-वारा, दर्याला उधाण आणि तुफान व इतर नैसर्गिक संकट कायम येत असते मात्र ह्या सर्व संकटावर मात करण्यासाठी कोकणकऱ्यांच्या मदतीला धाव देणारा देव म्हणजे रवळनाथ एका अर्थाने रवळनाथ कोकणी लोकांचा राखणदार समजला जातो,

गोवा व कोणातील खेडेगावांत रवळनाथाची मंदिरे आपल्याला आढळून येतात, कोकण व गोवा सोडले तर बेळगाव व कर्नाटक ह्या भागात देखील देव रवळनाथाला मानणारी लोक आपल्याला दिसून येतात, कोकण सोडलं तर इतर हिंदू धर्म असलेल्या राज्यात रवळनाथ तेवढा प्रसिद्ध नाही.

रवळनाथाची गोव्यामध्ये ४९ मंदिरे आहेत व महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात अवघ्या कुडाळ इथे २११ मंदिरे आहेत, रवळनाथाची इतकी मंदिरे पाहून आपण हा निष्कर्ष लावू शकतो की रवळनाथाला मानणारा कोकणात एक मोठा वर्ग आहे.

महालक्ष्मी रवळनाथ अमोना 

श्री देवकीकृष्ण रवळनाथ माशेल 

रवळनाथ – भक्तांना न्याय देणारा देव (God Of Justice)
न्याय देणारा देव म्हणून रवळनाथाकडे अजूनही लोक जातात, रवळनाथाची ३ मुख्य मंदिरे आहेत पहिलं मंदिर गोव्यातील पेडणे इथे आहे, दुसरे मंदिर चंदगड कोल्हापूर इथे आहे तर तिसरे मंदिर ओटावणे सावंतवाडी इथे आहे, असं सांगितलं जातं की हे तीन देव न्यायाधीशांची भूमिका निभावतात, मात्र न्याय द्यायचा असेल त्यावेळेस ह्यातील दोन रवळनाथच न्याय देतात व आपल्या भक्तांचे प्रश्न सोडवतात तिसरे रवळनाथ शांत राहतात व तिसऱ्या रवळनाथाला दक्षिणा किंवा त्यांनी दिलेले आदेश लोकांना स्वीकारावे लागतात अशी परंपरा कोकणातील लोक पिढ्यानपिढ्या चालवत आले आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक कोकणी माणूस दरवर्षी आपल्या राखनदारासाठी राखण देतो.

रवळनाथ चंदगड 

रवळनाथाला कोकणी भाषेत ३ नाव आहेत जे ह्या तिन्ही रवळनाथाचे स्वभाव सांगतात , सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवळनाथाला रवाळू असे म्हणतात हा रवळनाथ शांत स्वभाव व भक्तांवर दया दाखवणारा रवळनाथ असे समजले जाते, दुसऱ्या रवळनाथाला पिसो रवाळू असे म्हटले जाते हा रवळनाथ प्रचंड क्रोधीत रवळनाथ असे मानले जाते व तिसऱ्या रवळनाथाला शाहनो रवाळू असे म्हटले जाते हा रवळनाथ अतिशय समजदार असतो व भक्तांचे सुख दुःख ह्याला समजते असे मानले जाते.


रवळनाथाचा जन्म (दंतकथा)

रवलनाथाच्या जन्माच्या अनेक दंतकथा आहेत स्थल पुराणांमध्ये रवळनाथाचा जन्म सांगितला आहे तसेच पद्म पुराणातील करवीर महात्म्य मधील दंतकथा अशी आहे की रवळनाथ हा गुरू पौगंड व विमलभुजा यांचा मुलगा आहे व रवलनाथाला त्याच्या आयुष्याचे धेय्य महालक्ष्मी ने सांगितले की तू दृष्टांचा विनाश करशील.

रवळनाथ पश्चिमेचा रक्षक कसा बनला

पश्चिम घाटांमध्ये कोल्हासुर राक्षसाने प्रचंड हाहाकार माजवला होता व त्याच्या सोबतीला रत्नासुर व रक्तबजोहा राक्षस सामील झाले होते देवी महालक्ष्मीने रवलनाथाला ह्या दोन्ही राक्षसांचा वध करायला सांगितला, रवलनाथाने स्वतःची फौज बनवली व फौजेचा सेनापती म्हणून भूतनाथ ला नेमले त्यालाच काही ठिकाणी भैरव असेही म्हणतात, रवलनाथाच्या फौजेने रत्नासुर व रक्तभुजा वर आक्रमण करून त्याचा वध केला त्यामुळे रवलनाथाला पश्चिमेतील लोक रक्षक म्हणून संबोधू लागले.

भैरव नाथ रवळनाथाच्या सेनेचा प्रमुख 

तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो हा ब्लॉग लिहिण्याचे कारण असे की आजच्या पिढीला आपले जुने व पारंपरिक देव रवलनाथ यांच्या बद्दल माहिती नसते त्यांना अशी योग्य माहिती देण्यासाठी हा ब्लॉग लिहिला आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *