-Advertisement-
Home kalonji in marathi Kalonji In Marathi – कलोंजी ला मराठीमध्ये काय बोलतात

Kalonji In Marathi – कलोंजी ला मराठीमध्ये काय बोलतात

0
1597
-Advertisement-

Kalonji In Marathi – कलौंजी मराठी नाव

Kalonji In Marathi

 

 

Kalonji in Marathi – कलौंजी म्हणजे काय मराठीत सांगा

kalonji in marathi: नायजेला सॅटिवा (एन. सॅटिवा) असे कलौंजी चे साइंटिफिक नाव आहे, कलौंजी चे बीज जगभरातील विविध सभ्यतांमध्ये शतकानुशतके विविध प्राणी आणि मानवी आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे.

 

आतापर्यंत असंख्य शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार नायजेला सॅटिव्हाचे किंवा कलौंजीचे बीज आणि त्याचे मुख्य सक्रिय घटक, थायमोक्विनोन,वेगवेगळ्या आजारांविरूद्ध वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी असल्याचे मानले जाते.

-Advertisement-

न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार, कर्करोग, मधुमेह, दाहक परिस्थिती आणि वंध्यत्व तसेच बॅक्टेरिया, बुरशीजन्य, परजीवी आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे विविध संसर्गजन्य रोगांमध्ये नायजेला सॅटिव्हा किंवा कलौंजी लाभदायी आहे.

कलौंजी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे व सोबतच कमीतकमी दुष्परिणाम असल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सध्या हर्बल वनस्पतीपासून बनलेली औषधे जास्त उपलब्ध व वापरली जात आहेत, असं सांगितलं जात की जगभरात जवळपास 300,000 हर्बल वनस्पती आहेत व त्यामधील फक्त 15% वनस्पतींवर अभ्यास झाला आहे.

अशा या अनेक औषधी वनस्पतींमध्ये नायजेला सॅटिवा एल. किंवा कलौंजी जगभरातील इतिहासातील सर्वात मौल्यवान पौष्टिक समृद्ध औषधी वनस्पती मानली जाते आणि या प्रजातीच्या बियाण्याच्या पारंपारिक दाव्यांचा उपयोग मान्य करण्यासाठी असंख्य वैज्ञानिकांचा अभ्यास चालू आहे. (स्त्रोत : – NCBI)

हा लेख वाचा:- लसूण खाण्याचे फायदे – 11 Benefits Of Garlic In Marathi

 

कलौंजिचे तेल कसे बनवायचे – How To Make Black Seed Oil in Marathi

 

Kalonji in Marathi

 

साहित्य-

 1. 1 चमचा कलौंजिच्या बिया
 2. 1 चमचा मेथीच्या बिया
 3. 200 मिली खोबरेल तेल
 4. 50 मिली एरंड्याचे तेल
 5. 1 काचेची बॉटल

कृती-

 1. सर्वप्रथम कलौंजिच्या व मेथीच्या बिया बारीक करून घ्या मग त्या तुम्ही मिक्सर किंवा पाट्यावर बारीक करू शकता.
 2. वर बनवलेली पूड काचेच्या बॉटलमध्ये ओतून घ्या व त्यात खोबरेल व एरंड्याचे तेल घालून घ्या व झाकण घट्ट लावा.
 3. वरील बॉटल उन्हामध्ये 3 ते 4 दिवस ठेवावी जेणेकरून दोन्ही बियामधील द्रव्य तेलात उतरतील.
 4. मात्र उनात ठेवलेली बॉटल रोज हलवून ठेवत जा
 5. तीन ते चार दिवसानंतर हे तेल गाळून एका चांगल्या बॉटलमध्ये काढून घ्या व ह्याचा वापर तुम्ही नियमित करू शकता
 
 

Health Benefits Of Kalonji In Marathi

कलौंजिच्या तेलामध्ये त्वचेच्या समस्याग्रस्त परिस्थितीसाठी अनेक उपयोग व फायदे आहेत त्यातील काही फायदे खाली नमूद केले आहेत.

 

मुरुम – Kalonji For Acne In Marathi

 

Benefits Of Kalonji In Marathi

 

जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजीमध्ये नमूद केलेल्या अभ्यासा नुसार १० टक्के कलौंजिच्या तेलाने तयार केलेले लोशन वापरल्याने दोन महिन्यांनंतर मुरुमांचा प्रादुर्भाव कमी होतो.  ज्यांनी या अभ्यासात भाग घेतला त्यातील 67 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले.

हा लेख वाचा:- 

Anxiety Meaning in Marathi – एंनजायटी म्हणजे काय ?

 

कोरडे केस चांगले करते – Kalonji For Hairs In Marathi

 

Kalonji in Marathi

 

कलौंजिचे तेल मानवी केसांना मऊ करण्यासाठी आणि चमकदारपणासाठी लावले जाऊ शकते.

 
 

मुलायम त्वचेसाठी कलौंजि – Kalonji For Skin In Marathi

त्वचेचा ओलावा आणि हायड्रेशन सुधारण्यासाठी कलौंजिचे तेल किंवा मॉइश्चरायझर्स मध्ये वापर करू शकता.

 

जखमेवर उपचार – Kalonji For Wounds In Marathi

 

कलौंजि तेलाचा वापर जळजळ कमी करण्यासाठी आणि जखमेला बरे होण्यास मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो सोबतच बॅक्टेरियांशी देखील लढते. जखमेतील किटाणू मारून जखम सुखायला देखील कलौंजि लाभदायक आहे.

 
 

 

Traditional Uses Of Kalonji In Marathi –कलौंजी चे पारंपारिक उपयोग व फायदे

पारंपारिक कलौंजी चा उपयोग स्वादिष्ट मसाला म्हणून केला जातो ब्रेड, दही, लोणचे, सॉस आणि सॅलड्स सारख्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.

कलौंजी (नायजेला सॅटिवा) चे चमत्कारीक वनस्पती म्हणून देखील वर्णन केले गेले आहे तसेच अनेक हर्बल तज्ञांनी “द हर्ब फ्रॉम हेवन” म्हणून मानले आहे.

पैगंबर मोहम्मद यांनी कलौंजीच्या गुणकारी शक्तीचे वर्णन केले आहे, ते असे म्हणतात “ह्या काळ्या बीयांचा वापर मृत्यू वगळता प्रत्येक आजारावर उपाय म्हणून केला जाऊ शकतो”

‘द कॅनन ऑफ मेडिसिन’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध असलेल्या दहाव्या शतकातील प्रसिद्ध डॉक्टर अ‍ॅव्हिसेना यांनी शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी नायजेला बियाण्याचा वापर करण्याची शिफारस केली आहे आणि थकवा व निराशपणातून बरे होण्यास मदत देखील होते. 

नायजेला सॅटिवाचा उल्लेख पवित्र बायबलमधील औषधी गुणधर्मामुळे देखील केला गेला आहे आणि हिप्पोक्रेट्स आणि डायोस्कोरायड्स यांनी त्याला मेलेन्थिओन असे नाव दिले आहे.

 

 

कलौंजीचे फायदे Other Health Benefits Of Kalonji In Marathi

1.मधुमेह रुग्णासाठी लाभदायक कलौंजी Kalonji Useful in Diabetes

Kalonji in Marathi

कलौंजीमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरातील रक्तामधील साखरेच्या पातळीमध्ये घसरण दिसू शकते मात्र मधुमेह रुग्णांनी कलौंजीचे सेवन करताना आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवावे अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक कमी होऊ शकते.
मधुमेह नियंत्रणासाठी मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्स Zincovit Tablet & beplex forte tablet

2.ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते – Kalonji In Blood Pressure

 

 

Kalonji in Marathi

 

 

 

उच्चरक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि संबंधित रोगांपासून मुक्त होण्यासाठी असंख्य अँटीहाइपरटेंसिव्ह औषधांचा उपयोग केला जातो. 

तथापि, या एजंट्सची कार्यक्षमता केवळ 40-60% असते आणि सामान्यत: दोन किंवा दोनपेक्षा जास्त उच्चरक्तदाब कमी करणार्‍या औषधांचे मिश्रण करून त्यांचा वापर केला जातो.

ह्यामुळे साईड इफेक्ट्सच्या प्रभावाची शक्यता वाढते आणि थेरपीची किंमत देखील वाढवते, अशा वेळेस कलौंजीच्या (एन. सॅटिव्हा) बियाण्यासारख्या अनेक हर्बल उत्पादनांचा वापर केला जाऊ शकतो आणि वाढलेले ब्लड प्रेशर (बीपी) देखील कमी करू शकतो.

कलौंजिमध्ये थायमोक्विनोन नावाचे द्रव्य असते जे शरीरातील कॅल्शियम चॅनल ला ब्लॉक करून लघवीचे प्रमाण वाढवते व त्यामुळे वाढलेले ब्लड प्रेशर कमी होते. स्त्रोत :NCBI

ब्लड प्रेशर ची गोळी – Blood Pressure Tablet amlodipine tablet

3.डिप्रेशन व दैनिक जीवनातील तणाव कमी करते – Kalonji Useful in Depression

 

Kalonji in Marathi

 

 

न्यूरोलॉजिकल आजार जसे की डिप्रेशन हे जागतिक स्तरावर सर्वाधिक आजारांपैकी एक आहे.  याचा मुख्यत: न्यूरोट्रांसमीटरच्या हायपोएक्टिव्हिटीमुळे (क्षमतेपेक्षा कमी कार्यक्षमता) परिणाम होतो.

कलौंजिमध्ये असलेले फ्लावोनोईड व थायमोक्विनोन शरीरातील न्यूरोलॉजिकल प्रणालीवर सकारात्मक प्रभाव वाढवतात जेणेकरून डिप्रेशन व दैनिक जीवनातील तणाव कमी होण्यास मदत होते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 

4.दाहक विरोधी गुणधर्म Anti-Inflammatory Properties Of Kalonji In Marathi

अनेक रोगांमूळे होणारे शरीरातील दुखणे कमी होते.
सिस्टिक फायब्रोसिस, संधिवात, ऑस्टियोआर्थरायटीस, दमा, आणि कर्करोग यासारख्या विविध वैद्यकीय परिस्थिती तीव्र वेदनांशी संबंधित आहे. 

 

ह्या वेदनावर उपाय म्हणून सध्या अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स औषधे वापरली जातात ज्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर, बोन मॅरोव्ह डिप्रेशन, पाणी आणि मीठ धारणा यासारखे गंभीर दुष्परिणाम उद्भवतात.

 

कलौंजि नैसर्गिक वनस्पती असल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत व सोबतच कलौंजिमध्ये असणारे दाहकविरोधी गुणधर्म वेदनावर उपयोगी ठरतात.

5.जिवाणू रोधक गुणधर्म – Antimicrobial Properties Of Kalonji In Marathi

कलौंजिच्या बियाण्यांमध्ये थायमोक्विन द्रव्य असते ज्यामध्ये जिवाणू रोधक गुणधर्म असतात.

कलौंजि बॅसिलस, लिस्टेरिया, एन्ट्रोकोकस, मायक्रोकोकस, स्टेफिलोकोकस, स्यूडोमोनस, एशेरिचिया, साल्मोनेला, सेरोव्हर आणि विब्रिओ पॅराहेमोलिटिकस व्यतिरिक्त ग्रॅम-पॉझिटिव्ह आणि ग्रॅम-निगेटिव्ह बॅक्टेरियांच्या विरोधात सक्रिय आहे.

6.पुरुष वंध्यत्व मध्ये लाभदायी  – Kalonji In Male Infertility

पुरुषांमधील वंध्यत्वाशी संबंधित मुख्य समस्या म्हणजे शुक्राणूंचे डिसफंक्शन ही पुरुषांमधील वंध्यत्वाशी कारणांपैकी 60% कारण म्हणजे शुक्राणूंचे डिसफंक्शन आहे. 

शुक्राणूंचे डिसफंक्शन मुख्यतः ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे होते ह्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता, कार्यरत राहण्याची क्षमता व दीर्घकाळ टिकण्याची क्षमता देखील कमी होते. 

म्हणूनच, शुक्राणूजन्य संख्या, कार्यक्षमता व शुक्राणूंची गुणवत्ता वाढविण्यासाठी अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो.

अनेक संशोधना मध्ये असे सांगितले आहे की कलौंजिमद्ये (एन. सॅटीवा) खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात तसेच कलौंजिच्या चूर्णामध्ये गतिशील शुक्राणू पेशींच्या उत्पादन, उल्लेखनीय वाढ व प्रजनन शक्ती वाढण्याची क्षमता असते.

7.समरणशक्ती वाढविण्यासाठी व दम्याचा त्रास कमी करण्यासाठी कलोंजी:

कलोंजी ची बारीक केलेली पूड थोड्याश्या मधा सोबत रोज खाल्याने  स्मरणशक्ती वाढते.

तसेच जर आपण हे कोमट पाण्यात आणि पेयमध्ये मिसळले तर ते मुले आणि प्रौढांमधे श्वासोच्छ्वास (दम्याचा) कमी करण्यास देखील मदत करते, परंतु आपण ह्याचे सेवन कमीतकमी 45 दिवसांसाठी करणे आवश्यक आहे आणि कालावधी दरम्यान थंड पेय पदार्थ आणि खाणे टाळा.

 

8.डोकेदुखीपासून आराम

 

Kalonji in Marathi

 

 

आजच्या काळामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे डोकेदुखी.  एक गोळी घेण्याऐवजी, कपाळावर काळोंजी चे तेल चोळा, आणि आराम करा आणि डोकेदुखी नाहीशी होण्याची प्रतीक्षा करा.

 

डोके दुखी ची गोळी 

nicip plus tablet

 & 

sumo tablet

 

कलौंजि चे दुष्परिणाम – Side Effects Of Kalonji In Marathi

तसे कलौंजिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.  मात्र, जास्त प्रमाणात कलौंजि खाल्यास ते रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते किंवा निम्न रक्तदाब होऊ शकते.

तसेच स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील सावध रहावे कारण कलौंजिचे काय परिणाम होतात हे अजून कोणीही संशोधिले नाही त्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांनी कलौंजिचे सेवन न केलेलेच बरे.

कलौंजि शस्त्रक्रिया दरम्यान किंवा नंतर आपल्या रक्त जमण्याच्या प्रक्रियेस अडथळा आणू शकतात त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर कलौंजिचे सेवन न करण्याचा सल्ला आम्ही देतो.

कलौंजिची काही लोकांना ऍलर्जी असू शकते त्यामुळे कलौंजि खाल्ल्याने अंगावर लाल डाग येऊ शकतात आशा लोकांनी कलौंजिचे सेवन न करावे.

 

कलौंजिच्या बिया कशा ठेवाव्यात How To Store Kalonji In Marathi

कलौंजिच्या बियांना एक विशिष्ट मसाल्याचा सुगंध असतो मात्र हा सुगंध उघड्या हवेवर ठेवल्यास त्यातील सुगंध उडून जाऊ शकतो, त्यामुळे कलौंजिच्या बिया हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवा जेणेकरून कलौंजिच्या बियांचा सुगंध टिकून राहतो.

Weight Loss Recipe Of Kalonji In Marathi

 

पहिली रेसिपी – कलौंजि लिंबू पाक बिया

साहित्य-

 • 2 चमचे कलौंजिच्या बिया
 • 1 लिंबू
 
कृती-
 1. सर्वप्रथम कलौंजिच्या बिया एका छोट्या कपमध्ये घ्या व त्यामध्ये 1 संपूर्ण लिंबू पिळून घ्या, 
 2. अगदी कलौंजिच्या बिया लिंबूच्या रसात बूडतील एवढा लिंबाचा रस घ्या, ह्या भिजलेल्या कलौंजिच्या बिया उनात सुखायला ठेवा, 
 3. कमीतकमी 2-3 दिवसांत लिंबूचे पाणी आटून जाइल व ह्या सुखलेल्या 4 ते 5  बिया रोज दुपारी व संध्याकाळी पाण्यात घालून पिणे,
 4. शरीरातील फॅट्स/चरबी लवकरात लवकर कमी होण्यास सुरुवात होते.
 

Kalonji In Marathi video

FAQs Of Kalonji in Marathi

1.कलौंजी चा मराठी अर्थ काय ? कलौंजी मराठी शब्द ?

कलोंजी ला मराठीमध्ये काळे तीळ असे म्हटले जाते, बऱ्याच ठिकाणी कलोंजी असेच देखील म्हणतात. साईन्टिफिक भाषेत कलोंजीला नायजेला सटाईवा (nigella seeds in marathi) असे म्हटले जाते. 

 

2.black cumin seeds in marathi name ?

black cumin seeds in marathi: याला काळे जिरे असे म्हणतात, काळे जिरे व कलोंजी मध्ये फरक असतो. बरेच लोक black cumin seeds ला कलोंजी समजतात पण हे चुकीचे आहे. 

 

3.कलोंजीचे शरीराला काय फायदे आहेत ? 

 1. मधुमेह रुग्णासाठी लाभदायक कलौंजी
 2. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते
 3. डिप्रेशन व दैनिक जीवनातील तणाव कमी करते
 4. दाहक विरोधी गुणधर्म
 5. जिवाणू रोधक गुणधर्म 
 6. पुरुष वंध्यत्व मध्ये लाभदायी 
 7. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी
 8. डोकेदुखीपासून आराम
 

4.कलोंजी चे दुष्परिणाम काय आहेत ?

 

5.कलोंजी मधुमेहात उपयोगी आहे का?

होय कलोंजी मधुमेह रोगामध्ये फायदेशीर मानली जाते, रक्तातील साखर प्रभावीरीत्या कमी करते म्हणूनच मधुमेह रुग्णांच्या आहारात कलोंजीचा समावेश करावा. 

इतर लेख : 

cheston cold tablet uses in hindi

इतर लेख : 

Unienzyme Tablet Uses In Hindi

 
-Advertisement-

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here