Mutual Fund Meaning in Marathi म्युच्युअल फंड म्हणजे काय

Mutual Fund Meaning in Marathi


mutual fund meaning in marathi

Advertisements

 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे mayboli.in मध्ये, आज आपण पाहणार आहोत mutual fund meaning in marathi व म्युच्युअल फंड चे प्रकार , म्युच्युअल फंड कसे काम करतात व इतर बऱ्याच गोष्टी.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात म्युच्युअल फंड म्हणजे काय

What is mutual fund in marathi ?

मुळात Mutual ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या मध्ये दोन्ही पक्षांना फायदा हवा असतो, जसे म्युच्युअल फंड द्वारे कंपनी पैसे जमा करते व स्वतःच्या कामासाठी वापरते आणि ह्या कामातून झालेला नफा ती त्यांच्या ग्राहकांसोबत वाटून घेते अशा प्रकारे ह्या दोन्ही पक्षांना म्युच्युअल बेनिफिट मिळते.

आता वळूयात मूळ प्रश्नाकडे की mutual fund meaning in marathi

mutual fund meaning in marathi

 

असे समजा की म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारचे आर्थिक वाहन आहे ज्यात अनेक गुंतवणूकदारांकडून स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा केले जातात, म्युच्युअल फंड हे काही मॅनेजर चालवतात उदा – प्रत्येक म्युच्युअल फंड चे मॅनेजर तुम्ही लावलेले पैसे त्यांच्या हुशारीने चांगल्या स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवतात आणि हे पैसे काही दिवसांनी नफा किंवा तोटा होऊन वाढतात किंवा कमी होतात मात्र बऱ्यापैकी वेळेस हे वाढतातच.

 

 

म्युच्युअल फंड कसे कार्य करतात how mutual fund works in marathi

म्युच्युअल फंड्स ला दुहेरी स्वभाव असतो एक म्हणजे ही एक गुंतवणूक आहे आणि दुसरी म्हणजे एक वास्तविक कंपनी देखील आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्स विकत घेता तेव्हा एक गुंतवणूक तर करतच आहात व सोबत एका किंवा अनेक कंपनी चे शेअर विकत घेत असता.

mutual fund concept in marathi

mutual fund concept in marathi


जरा सोप्या भाषेत सांगतो उदा- जेंव्हा तुम्ही एखाद्या कंपनी चे शेर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या विशिष्ट कंपनी चे भागीदार बनता मात्र एका म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही अनेक गोष्टी मध्ये गुंतवणूक करत असता जसे की स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स इत्यादी , मात्र ह्यातील कुठल्या गोष्टी मध्ये किती गुंतवणूक करायची हे फंड मॅनेजर ठरवतात.

what is difference between sip and mutual fund in Marathi

SIP म्हणजेच म्युचुअल फंड मध्ये केलेली सीस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट, मुळात SIP चा फुल फॉर्म आहे सीस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.

benefits of mutual funds in marathi

म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूकदारांना तीन प्रकारे परतावा मिळतो:
1.डिव्हिडंट्स
2.कॅपिटल गैन
3.कॅपिटल गैन ची पुन्हा गुंतवणूक

 

1.डिव्हिडंट्स – या प्रकारामध्ये फंडाच्या पोर्टफोलिओमधून झालेला नफा म्युच्युअल फंड चे मॅनेजर गुंतवणूकदारांना समभागात वाटून देते हा नफा एकतर तुम्ही काढून घेऊ शकता अथवा पुन: गुंतवणूकीसाठी देखील वापरू शकता.

2.कॅपिटल गैन – जर तुमच्या म्युच्युअल फंडचे मॅनेजर फंडाच्या किमती वाढल्यामूळे नफा काढून घेण्यासाठी सिक्युरिटीजची विक्री करते ज्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडाला भांडवली नफा होतो त्यातून गुंतवणूकदारांना या नफ्यावर पैसे दिले जातात.

3.कॅपिटल गैन पुन्हा गुंतवतात
जर फंड होल्डिंगची किंमत वाढली परंतु फंड व्यवस्थापकाद्वारे ती विकली गेली नाहीत तर फंडाच्या समभागांची किंमत वाढते. त्यानंतर आपण आपल्या म्युच्युअल फंडाचे शेअर्स बाजाराच्या नफ्यासाठी विकू शकता.

 

फंड मॅनेजर म्हणजे कोण ? फंड मॅनेजर काय करतात ?

तुम्ही असे समजा की म्युच्युअल फंड एक कंपनी आहे व त्याचे CEO हे फंड मॅनेजर असतात जे ठरवतात की तुमचे पैसे कुठल्या स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवायचे, काही मोजके लोग ह्यांच्या सोबत काम करत असतात जसे की एखादा मार्केट अनलिस्ट जो चांगले स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स सिलेक्ट करायला मदत करतो किंवा बऱ्याचदा हे काम स्वतः फंड मॅनेजर देखील करतात, अनेकदा तुम्हाला हे पहायला मिळेल की फंड मॅनेजर हेच मालक असतात, काही फंड मॅनेजर देखील असतात जे म्युच्युअल फंड ची NAV ठरवत असतात या सोबतच एक कॉम्पलायन्स ऑफिसर देखील लागतो जो सरकार च्या नियमांचे पालन करण्यासाठी जबाबदार असतो.

mutual funds types in marathi म्युच्युअल फंड चे प्रकार मराठी मध्ये.

1. इक्विटी फंड्स equity mutual funds meaning in marathi
2. फिक्स्ड इनकम फंडस् Fixed Income Funds In Marathi / liquid funds meaning in marathi
3. इंडेक्स फंडस् Index Funds In Marathi
4. बॅलन्स फंडस् Balanced Mutual Funds Meaning In Marathi
5. मनी मार्केट फंडस् Money Market Funds In Marathi
6. इनकम फंडस् Income Mutual Funds Meaning In Marathi
7. इंटरनेशनल फंडस् International Mutual Funds Meaning In Marathi
8. स्पेशालिटी फंडस् Speciality Funds In Marathi
9. एक्सचेंज ट्रेडेड फंडस् Exchange Traded Funds In Marathi

वरील दिलेले सर्व प्रकारचे म्युच्युअल फंडचा आपण संपूर्ण तपशील पाहणार आहोत.

 

 

1. इक्विटी फंड्स equity mutual funds meaning in marathi

mutual fund meaning in marathi

 

म्युच्युअल फंड्सची सर्वात मोठी श्रेणी म्हणजे इक्विटी जिला स्टॉक फंड म्हणून देखील ओळखतात, या प्रकारचा फंड मुख्यत: स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो, या गटामध्ये विविध उपवर्ग देखील आहेत, इक्विटी फंड्स मुख्यतः तीन प्रकारचे असतात स्मॉल-, मिड- किंवा लार्ज-कॅप.
इक्विटी फंडांचे विश्व समजण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्टाईल बॉक्स वापरणे, ज्याचे उदाहरण खाली आहे.
स्मॉल कॅप फंडस् हे आशा कंपण्याचे शेअर असतात ज्या कंपन्याच मार्केट 300 मिलियन ते 2 बिलियन डॉलर एवढे असते.
लार्ज कॅप फंडस् हे आशा कंपण्याचे शेअर असतात ज्या कंपन्याच मार्केट 10 बिलियन डॉलर एवढे असते.
तर मिड कॅप फंडस् हे स्मॉल व लार्ज कॅप मधील असणाऱ्या कंपन्यांचे शेअर असतात.

 

2. फिक्स्ड इनकम फंडस् Fixed Income Funds In Marathi

फिक्स्ड इनकम फंडस् हे देखील एक लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे.
फिक्स्ड इनकम म्युच्युअल फंडामध्ये आशा गोष्टी मध्ये गुंतवणूक केली जाते जिथुन एक ठराविक इमकम परत मिळू शकते जसे की सरकारी बॉण्ड्स, कॉर्पोरेट बॉण्ड्स किंवा इतर डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स. ह्या म्युच्युअल फुंड्स ची आयडिया अशी आहे की आशा ठिकाणी गुंतवणूक करायची जीतून व्याज निर्माण होईल व हे व्याज नफ्याच्या रुपात गुंतवणूक दारांना दिले जाईल.

 

3. इंडेक्स फंडस् Index Mutual Funds In Marathi

गेल्या काही वर्षांत अत्यंत लोकप्रिय झालेला म्युच्युअल फंडस् म्हणजे “इंडेक्स फंड्स”.
ह्या फंडची गुंतवणूक करण्याची रणनीती अशी आहे की मार्केटमधले लार्ज कॅप कंपनीचे फंडस् घेण्यापेक्षा अशा कंपनीचे फंडस् घेतात ज्या कंपन्या लार्ज कॅप कंपनी ला सर्व्हिस देऊन नफा कमवतात या मुळे कमी पैशात चांगले स्टॉक मिळतात आणि नफा देखील चांगला होतो, हे फंड बर्‍याचदा खर्चात संवेदनशील गुंतवणूकदारांना ध्यानात घेऊन तयार केले जातात.

 

4.बॅलन्स फंडस् Balanced Mutual Funds Meaning In Marathi / liquid funds meaning in marathi

mutual fund meaning in marathi

बॅलन्स फंडस् ला हायब्रीड फंडस् असेही म्हणतात ह्या फंडस् मध्ये गुंतवणूक अशाप्रकारे केली जाते की एका असेट ची रिस्क दुसऱ्या असेट मधून कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

इतर स्टॉक, बॉन्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स किंवा वैकल्पिक गुंतवणूक यामध्ये बॅलन्स फंडस् पैसे गुंतवतात.

 

5.मनी मार्केट फंडस् Money Market Funds In Marathi

मनी मार्केट फंडस् एकदम सुरक्षित (जोखीम-मुक्त) म्युच्युअल फंडस् असतात, मुख्यतः सरकारी ट्रेझरी बिला मध्ये बहुतांश पैसे गुंतवले जातात ज्यामुळे जोखीम खूप कमी असते पण त्यासोबतच नफा सुद्धा तेवढा जास्त नसतो मात्र हा नफा आपल्या बँकेतील ठेवीं पेक्षा थोडासा जास्तच असतो.
अधिक सांगायचे झाले तर ठराविक परतावा म्हणजे आपण नियमित तपासणी किंवा बचत खात्यात जितके पैसे कमवाल त्यापेक्षा थोडे अधिक आणि ठेवीच्या सरासरी प्रमाणपत्र (सीडी) पेक्षा थोडेसे कमी.

 

6.इनकम फंडस् Income Mutual Funds Meaning In Marathi

इनकम फंडस् चे मुख्य धोरण हे असते की एक समान इनकम सतत निघाली पाहिजे, हे फंड मुख्यत: सरकारी आणि उच्च-गुणवत्तेच्या कॉर्पोरेट कर्जात गुंतवणूक करतात आणि व्याज प्रवाह प्रदान करण्यासाठी परिपक्वता येईपर्यंत हे रोखून ठेवतात गुंतवणुकीतून येणारे व्याज गुंतवणूक दारांना नफा म्हणून दिले जातात.

 

7. इंटरनेशनल फंडस् International Mutual Funds Meaning In Marathi

इंटरनेशनल फंडस् हे मुख्य बाहेरच्या देशातील कंपन्यामध्ये गुंतवणूक करते त्यामुळे हे निश्चित करणे अवघड होते की इंटरनेशनल फंडस् मध्ये डोमेस्टिक फंडस् पेक्षा जोखीम कमी आहे की जास्त हे ठरवणे अवघड ठरते.
इंटरनेशनल फंडस् मध्ये दोन बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली बाजू म्हणजे देशातील राजकीय परिस्थिती अस्थिर असेल तर जोखीम वाढते व दुसऱ्या बाजूला देशाची इकॉनॉमी चांगली होत असेल तर नफा देखील चांगला होऊ शकतो.

 

 

8. स्पेशालिटी फंडस् Speciality Mutual Funds In Marathi

स्पेशालिटी फंडस् मध्ये असे फंडस् असतात जे एकदम लोकप्रिय आहेत मात्र इतर कुठल्याही फंडस् मध्ये नसतात,हे फंडस् अशा सेगमेंट ला टार्गेट करतात जे इकॉनॉमी वाढवायला मदत करतात एक चांगला चालणार सेगमेंट ह्या फंडस् चा गुंतवणूकीचा मुख्य स्रोत असतो.


स्पेशालिटी फंडमध्ये देखील दोन प्रकार आहेत.
1.रिजिनल फंडस् – ह्यामध्ये एखाद्या विशिष्ट एरिया मधील देशामध्ये गुंतवणूक केली जाते जशी की नॉर्थ अमेरिका,आशिया,रशिया इत्यादी.

2.सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फंडस्.

केवळ अशा कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात जी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे किंवा विश्वासांचे निकष पूर्ण करतात. उदाहरणार्थ, काही सामाजिकदृष्ट्या जबाबदार निधी, उद्योगांमध्ये तंबाखू, मद्यपी, शस्त्रे किंवा आण्विक उर्जाचा वापर करत नाही. असे इतर फंड मुख्यत: सौर आणि पवन ऊर्जा किंवा पुनर्वापर यासारख्या हिरव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करतात.

 

9. एक्सचेंज ट्रेडेड फंडस् Exchange Traded Funds In Marathi

mutual fund meaning in marathi

 

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) म्हणजे म्युच्युअल फंडावरील ट्विस्ट. यामध्ये अधिक लोकप्रिय असलेल्या स्टॉक वर हे फंडस् पैसे लावतात आणि नफा कमवतात हे ह्यांचे मुख्य गुंतवणूक स्रोत आहे.

 

10. investment fluctuation fund meaning in marathi

गुंतवणूकीतील उतार-चढ़ाव बॅलन्स करण्यासाठी दर वेळेस नफ्यातून काही हिस्सा बाजूला ठेवला जातो हा हिस्सा मार्केट मध्ये नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई साठी वापरला जातो ह्यालाच investment fluctuation fund असे म्हणतात.

म्युच्युअल फंड फी Charges Of Mutual Fund In Marathi

म्युच्युअल फंड ला वार्षिक ऑपरेटिंग फी किंवा भागधारक शुल्क त्यांच्या ग्राहकाकडून घेते काही म्युच्युअल फंड घेत सुद्धा नाहीत, सामान्यत: १% ते 3 % हा चार्ज असतो,म्युच्युअल फंड वार्षिक ऑपरेटिंग फी एकत्रितपणे खर्चाचे प्रमाण चार्ज करते. एखाद्या फंडाचे खर्च प्रमाण म्हणजे सल्लागार किंवा व्यवस्थापन फी आणि त्याच्या प्रशासकीय खर्चाचा सारांश असतो.

 

म्युच्युअल फंड चे फायदे व तोटे Advantages & Disadvantages of Mutual Funds

तुम्ही नवे गुंतवणूकदार असाल किंवा जुने तुम्ही म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा प्रकार नक्की अनुभवला पाहिजे, लॉंग टर्म पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंड लाभदायक आहे तसेच म्युच्युअल फंड्स ला काही फायदे व तोटे देखील आहेत.

 

म्युच्युअल फंड चे फायदे Advantages of Mutual Funds

1.लिक्विडीटी

म्युच्युअल फंड हे सहज सोयीनुसार खरेदी व विकले जाऊ शकतात ज्यामुळे तुम्ही नफा झालेले म्युच्युअल फंड विकू शकता मात्र एक्सिट फी बाबत लक्ष ठेवा व सोबतच तुम्हाला म्युच्युअल फंड मधून लवकर निघाल्यामुळे पेनलटी देखील बसू शकतो,
याचसोबत हे सुद्धा लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड विक्री ची ऑर्डर दिवसातून एकदाच लागू शकते.

 

2.डायव्हर्सिफिकेएशन

म्युच्युअल फंडा शेअर मार्केट पेक्षा जोखीम कमी आहे कारण त्यांची कामगिरी फक्त शेअर मार्केट व बाजारातील इतर हालचालींवर आधारित नसते. म्हणूनच, जोखीम कमी करण्यासाठी फंड मॅनेजर नेहमीच एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गात (इक्विटीज, डेट्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स इ.) गुंतवणूक करतो. याला विविधीकरण म्हणतात. अशाप्रकारे, जेव्हा एक मालमत्ता वर्ग काम करत नाही, तेव्हा दुसरा गुंतवणूकदारांचे नुकसान टाळण्यासाठी उच्च परताव्याची भरपाई करू शकतो.

 

3.तज्ञ व्यवस्थापन

आपल्या सर्वांनाच मार्केट मध्ये गुंतवणूकीची समज असते असे नाही त्यामुळे म्युच्युअल फंड चे मॅनेजर आपल्या पैश्याची चांगली गुंतवणूक करण्यासाठी मदत करतात, नेहमी म्युच्युअल फंड विकत घेताना त्याचा फंड मॅनेजर ची रेपुटेशन बघून घ्या.

 

 

4.मोठ्या प्रमाणात व्यवहारासाठी कमी खर्च

ह्याचे स्पष्टीकरण एक उदाहरण देऊन करतो जशे की तुम्ही 100 ग्राम ची टूथपेस्ट घ्याल तर ती 50 ग्राम च्या दोन टूथपेस्ट पेक्षा कमी किमतीत येते तसेच म्युच्युअल फंड हे विविध स्रोतांमध्ये गुंतवणूक करते ज्यामुळे आपले इतर खर्च वाचतात.

 

5.आपल्या आर्थिक ध्येयांना प्राप्त करण्यासाठी

म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म पैसे कमविण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे तुम्ही छोट्या छोट्या रक्कम दर माही किंवा हफत्याला गुंतवून लांबच्या वेळेस एक चांगली रक्कम निर्माण करू शकता.

 

 

 

6.टॅक्स बेनिफिट

काही म्युच्युअल फंड टॅक्स बेनिफिट देखील देतात जे अतिशय लाभदायी आहे, आपल्या कमाईवरून टॅक्स बेनिफिट मिळवण्यासाठी अशा सरकारी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

 

म्युच्युअल फंड चे तोटे Disadvantages of Mutual Funds In Marathi

1.म्युचुअल फंड ची फी

म्युचुअल फंड ला मॅनेज करण्यासाठी लागणारी फी व फंड मॅनेजर ची फी ही गुंतवणूकीतून घेतली जाते साधारणपणे ही फी 1 ते 3 टक्के असते.


2.Subject To Market Risk म्युच्युअल फंड मध्ये असलेली जोखीम.

म्युच्युअल फंड हे मार्केट मधील घडामोडी वर निर्धारित असतात त्यामुळे त्यात जोखीम ही असतेच, त्यामुळे कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना नेहमी म्युच्युअल फंड च्या स्कीम चे दस्तावेज वाचूनच गुंतवणूक करा.


3.लॉक इन पिरियड

काही म्युच्युअल फंड हे असे असतात ज्यामध्ये लॉक इन पिरियड असतो हा एक ठराविक कालावधी असतो ह्या काळात तुम्ही म्युच्युअल फंड मधून पैसे काढू शकत नाहीत.


म्युच्युअल फंड शिकण्यासाठी पुस्तके mutual funds books in marathi

1. धनवृद्धीसाठी म्युचुअल फंड

केवळ बचत करून भागणार नाही. प्राप्तीकर वाचवायचा म्हणून कशीही गुंतवणूक करून चालणार नाही.आपली गुंतवणूक डोळस हवी. आपल्या बचतीच्या रकमेत वाढ करणारी हवी,त्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करणारे पुस्तक अरविंद परांजपे यांनी लिहिलेलं आहे.

mutual funds books in marathi

Buy On Amazon

Click Here

 

2.भारतीय म्युच्युअल फंड ची ओळख – Guide to Indian Mutual Funds Marathi

अंकित गला व जीतेंद्र गला ह्या आर्थिक तज्ञांनी लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला भारतीय म्युच्युअल फंड मधील A to Z ज्ञान देतात, जर तुम्ही म्युचुअल फंड च्या क्षेत्रात नवीन असाल तर हे पुस्तक नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला एक चांगली माहिती व ज्ञान मिळेल

mutual funds books in marathi

Buy On Amazon

Click Here

3.Indian Mutual Funds Handbook (5th Edition): A Guide for Industry Professionals and Intelligent Investors

म्युचुअल फंड बाबत जर तुम्हाला एकदम जास्त माहिती मिळवायची असेल आणि म्युचुअल फंड चे एक्सपर्ट तुम्हाला बनायचे असेल तर हे पुस्तक तुम्ही घ्याच, भारतीय म्युचुअल फंड मध्ये निवेश करणाऱ्या मोठ मोठे लोक ह्या पुस्तकाची शिफारस करतात.

mutual funds books in marathi

 

Buy On Amazon

Click Here

4.शेअर्स चे फंडामेंटल अनलिसिस

शेअर मार्केट मध्ये पैसे कमवण्याची किल्ली ह्या पुस्तकात आहे असे मी सांगेल अतिशय विश्वासू व शेअर चे अनुभव असलेल्या व्यक्तिच्या अनुभवातून लिहिलेलं हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या, हे पुस्तक वाचून मी वर्षभरात 10 लाख पेक्षा जास्त चा नफा मी कमावला आहे.

mutual funds books in marathi

 

Buy From Amazon

Click Here


तर मित्रानो आजचा आपला हा लेख mutual fund meaning in marathi तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट करून सांगा व इतर काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट करून विचार.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *