Advertisements
मासिक पाळीमध्ये वेदना का होतात ?
मासिक पाळीच्या वेळेस पोट दुखणे, पाठ व पोटऱ्या दुखणे हे सामान्य आहे.मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशयाच्या स्नायूमध्ये आकुंचन व विश्रांती होत असते (contraction and relaxation),शिवाय ह्याचसोबत प्रोस्टाग्लॅन्डिनची पातळी देखील वाढलेली असते त्यामुळे पोटात पेटगे व वेदना होतात,काही मुलींना किंवा स्त्रियांना उलटी किंवा डायरिया देखील होऊ शकतो.
कोणत्या स्त्रियांना व मुलींना मासिक पाळीमध्ये वेदना होऊ शकतात :
- 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे
- ज्यांना मासिक पाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो
- कधी जन्म दिला नाही
- कमी वयात मासिक पाळी चालू होणाऱ्या मुलींना
मासिक पाळीत येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरघुती उपाय
1.आले व काली मिरी ची चहा
आले व काली मिरीची चहा एकदम फायदेशीर आहे तुम्हाला हवे तर यामध्ये तुम्ही मध सुध्दा घालू शकता, आले शरिरातील प्रोस्टाग्लॅन्डिन कमी करते ज्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात, त्यासोबतच अनियमित मासिक पाळीमध्ये सुद्धा आले फायदेशीर आहे.
अनेक स्त्रियांना व मुलींना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो त्यामुळे हा चहा नेहमी पिल्याने यातून सुद्धा मुक्तता मिळते.
2.जिऱ्याची चहा
जिऱ्यामध्ये अँटी स्पास्मोडिक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे जिऱ्याची चहा प्यायल्याने पेटगे येणे झटपट थांबते.
3.बडीशेप
Source:-Pubmed
4.हळदीचे दूध
हळदी मध्ये दाहक विरोधी व प्रतिजैविक गुणधर्म असतात म्हणून दुधामध्ये हळद घालून गरम करून एक ग्लास दूध पिल्याने मासिक पाळीतील वेदना झटपट थांबतात.
5.नॅचरल तेलाची मसाज
पोटाच्या खालच्या भागाला लव्हेंडर तेल लावून हळुवारपणे मालीश केल्याने पोटातील वेदना कमी होतात
तसेच तुम्ही मसाजसाठी तिळाचे तेल देखील वापरू शकता कारण तिळाच्या तेलात लिनोलिक एसिड असते ज्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
6.जंक फूड टाळा
यावेळी कदाचित आपल्याला चिप्स आणि बिस्किट व इतर जंक फूड खायची इच्छा होते, परंतु आम्ही आपल्याला खात्री देऊ शकतो की जंक फूड यावेळी ते आपले दुखणे वाढवू शकते.
मासिक पाळीमध्ये आहार कसा असावा ? काय खावे व काय नाही?
2.शक्यतो गरम जेवण खाण्यावर भार द्या
3.जेवणात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करा
4.प्रोटिनयुक्त आहाराचा लाभ घ्यावा, सोबत काकडी कोशिंबीर व सलाड खावे
5.मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ओव्याचे गरम पाणी प्यावे
6.आहारात तूप व दही वापरा जेणेकरून तुमची पचनशक्ती वाढेल व पोटाला आराम भेटेल
7.मासिक पाळीत साधा व हलका आहार ठेवा
मासिक पाळीमध्ये वागणुक कशी असावी ?
1. आपले विचार सकारात्मक व मन प्रसन्न ठेवावे
2. जास्त विचार करत बसू नये, आपले मन इतर कामा मध्ये रमवून ठेवावे सोबतच लक्षात ठेवा की जास्त कष्टाची कामे करू नयेत
3. दिवसा झोपू नये ह्या मुले रक्तस्त्राव वाढू शकतो मात्र रात्री वेळेत झोपणे व सकाळी लवकर उठून अंघोळ करणे
4. सॅनिटरी पॅड दर 3 ते 4 तासाने बदलत रहावे
5. पाळीच्या जागेची स्वच्छता ठेवावी
मासिक पाळीबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
उत्तर: सामान्य स्त्रिया व मुलींमध्ये मासिक पाळी 3 ते 5 दिवस असते, मात्र काही स्त्रियांना 7 दिवस सुद्धा राहू शकते व मासिक पाळी 3-4 दिवस मागे पुढे देखील होऊ शकते त्यामुळे काही काळजी करण्याची बाब नाही.
2.मासिक पाळीच्या वेळेस शरीरसंबंध ठेवणे योग्य आहे का ?
मासिक पाळीच्या वेळेस देखील तुम्ही शरीरसंबंध ठेऊ शकता मात्र कंडोम चा वापर व आपल्या स्त्री ची इच्छा महत्वाची आहे.
3.सॅनिटरी पॅड किती वेळा बदलला पाहिजे?
तद्वतच, वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी आपण दर तीन ते चार तासांनी आपला सेनेटरी पॅड बदलला पाहिजे.
मात्र सेनेटरी पॅड कधी बदलायचे हे प्रत्येकाच्या रक्तप्रवाहावर अवलंबुन असते, काही स्त्रियांना कमी असतो तर काहींना जास्त असतो त्यानुसार सॅनिटरी पॅड बदलणे आवश्यक.
4.मासिक पाळी दरवेळेस उशिरा येणे किंवा 2-3 महिने मासिक पाळी न येणे.
मासिक पाळी दरवेळेस उशिरा येणे ह्यात काही काळजी करण्याची गोष्ट नाही, मात्र 2 ते 3 महिने जर मासिक आली नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
Advertisements