कोरोना वायरस ची लक्षणे अणि नवा कोरोना वायरस – कोरोना विषाणूबद्दल माहिती Corona Virus Information In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Advertisements
कोरोना विषाणूबद्दल माहिती


कोरोना विषाणूबद्दल माहिती – कोरोना वायरस ची लक्षणे

कोरोना हा मागील २० वर्षातील सर्वात भयानक व्हायरस आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे,

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

रोगाच्या सुरुवातीला डॉक्टर्स कोरोनाला न्युमोनिया ऑफ अननोन इटीओलॉजी असे संबंधत असत मात्र रोगाची तीव्रता बघता ३१ डिसेंम्बर २०१९ ला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू ची नोंद घेतली, चीनमधील ऊहान शहराच्या हुबई प्रांतात कोरोना विषाणूची सर्वप्रथम लागण आढळून आली.
कोरोनाचा संक्रमन करण्याचा वेग व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जानेवारी ३०, २०२० ला इंटरनॅशनल हेल्थ रेगुलशन संघटनेने कोरोना विषाणू ला जागतिक आपत्ती घोषित केले.

इंटरनॅशनल कमिटी ऑन टॅक्सोनॉमी ऑफ व्हायरस संघटनेने कोरोनाला SARS-CoV2 असे नाव दिले जो पूर्वी आढळून आलेल्या SARS-CoV सारखाच होता.

कोरोना कसा दिसतो ?

कोरोना विषाणूबद्दल माहिती


इलेक्टरॉन मायस्क्रोप मध्ये एखाद्या राज्याचा मुकुट असावा असा कोरोना व्हायरस चा आकार आहे त्याच्या भोवताली ग्लायकोप्रोटिन चे टोकेरी काटे दिसून येतात असा हा भयानक दिसणारा कोरोना व्हायरस जगभर पसरत आहे व प्रचंड लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

कोरोना विषाणूची लक्षणे…

ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे आढळतात.

कोरोना विषाणूबद्दल माहिती


Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi


कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा ?


कोरोना आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो तसेच शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब उघड्या वातावरणात पडतात आशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब व कोरोना व्हायरस हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याचा सवयीमुळे हे चिकटलेले विषाणू संक्रमन करतात.

कोरोना विषाणूबद्दल माहिती




कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी


कोरोना किंवा इतर प्राणघातक श्वसनसंस्थेशी जोडीत असणारे आजार होऊ नये म्हणून खलील जबाबदारी घ्यावी.
१) श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी सम्पर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे
२)हात वारंवार व स्वच्छ धुणे. अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर चा नियमित वापर करणे
३)शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल किंवा टीशु पेपर ठेवणे
४)अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नी
५)फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.
कोरोना विषाणूबद्दल माहिती




कोणत्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी ?


१)ताप व खोकला व श्वशनास त्रास होणाऱ्या व्यक्ती
२)हा त्रास कोणत्या आजरा पासून होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोना बाधित देशात प्रवास केला असल्यास
३)रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवेश केला आहे

आपल्या मनातील प्रश्न…. FAQ CORONA VIRUS IN MARATHI


Covid-19 कोरोना म्हणजे काय ? या आजाराची सुरुवात कशी झाली?

हा नुकताच शोध लागलेला कोरोना विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये या कोरोना साथीची सुरुवात झाली असून आता तो जगभर पसरला आहे.

कोरोना झाला आहे हे कसे ओळखावे?

कोरोनाची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आणि खोकला. काही रुग्णामध्ये अंगदुखी श्वास घेण्यास त्रास किंवा अतिसार असू शकतो. ही लक्षणे सौम्य असतात व हळूहळू तो अधिक तीव्र होतात.

कोरोनाची लागण कशी होते ?

खोकला किंवा श्वास घेत असताना नाक किंवा तोंडातून लहान थेंबांद्वारे हे विषाणू एक व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. हे लहान थेंब सभोवतालच्या वस्तू किंवा पृष्ठभागावर पडतात त्यांनंतर इतर लोकांनी अशा वस्तुंना किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्यास त्यांच्या हातावाटे डोळे, नाक किंवा तोंडातुन हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास आपल्याला देखील हा आजार होऊ शकतो. म्हणूनच आजारी असलेल्या व्यक्तीपासून 1 मिटर लांब राहणे आवश्यक आहे.

एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसतानाही या आजाराचा प्रसार होऊ शकतो का ?

हा आजार पसरण्याचा मुख्य मार्ग म्हणजे श्वासोच्छ्वास (ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्याच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातुन पाडणाऱ्या थेंबांद्वारे पसरला जातो) त्यामुळे मुळीच लक्षण नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून हा आजार पसरण्याचा धोका खूप कमी आहे.

गंभीर आजार होण्याचा धोका कोणाला आहे ?

वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारखे दीर्घ मुदतीचे आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका जासफ आहे.

मी व माझ्या घरच्यांनि कोरोना विषाणूच्या संसर्गा पासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

हा आजार सामान्यतः सौम्य असतो, विशेषतः मुले आणि तरुण प्रौढांसाठी. तथापि हा विषाणू वृध्द लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह व्यक्तीमध्ये गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे या संसर्गाचा त्यांच्यावर होणाऱ्या परिणामविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे त्यामुळे खलील जबाबदारी घेणे आवश्यक.
१) श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी सम्पर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे
२)हात वारंवार व स्वच्छ धुणे. अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर चा नियमित वापर करणे
३)शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल किंवा टीशु पेपर ठेवणे

कोरोना विषाणू वर लस किंवा औषध आहे का ?

अजून नाही,आजपर्यंत, हा विषाणू रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी कोणत्याही लसीचा शोध लागला नाही आणि विशिष्ट अँटिव्हयरल औषध उपलब्ध नाही.

स्वतः चे रक्षण करण्यासाठी मास्क घालायचा का ?

जर आपणास आजाराची लक्षणे असतील तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर आवश्यक आहे.

कोरोनाचा अधिषयीन कालावधी किती आहे ?

अधिषयीन कालावधी म्हणजे कोरोना विषाणूचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यापासून ते आजाराची लक्षणे दिसण्या पर्यंतचा काळ. हा कालावधी 1 ते 15 दिवसांचा असतो.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *