1983 मधील भारतीय संघाचे खेळाडू सध्या काय करतात 1983 World Cup Winners : Where Are They Now

Advertisements

1983 चा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारताचा क्रिकेटमध्ये जगभरात 11 वा नंबर होता, भारतीय संघ अगदी झिम्बाब्वे पेक्षाही खाली होता, खरं तर कोणी विचारही केला नसेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकेल पण तरीही भारतीय संघाने संघर्ष करत विश्वचषक जिंकला.

1983 मधील भारतीय संघाचे खेळाडू सध्या काय करतात 1983 World Winners : Where Are They Now  


1.संदीप मधुसूदन पाटील














हार्ड हिटींग मिडल ऑर्डर बॅट्समन अशी संदीप पाटील यांची ओळख.
क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर संदीप पाटील केनिया टीम चे कोच बनले व त्यांच्या कोचिंगच्या जोरावर केनियची टीम 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहचली होती.
संदीप पाटील हे BCCI निवड समितीचे अध्यक्ष देखील होते तसेच सध्या त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनतोय ज्या मध्ये त्यांचा मुलगा चिराग पाटील त्यांची भूमिका साकारत आहे.

2. दिलीप वेंगासकर















मिडल ऑर्डर ला खेळणारे दिलीप वेंगासकर यांना कर्नल ह्या नावाने सुद्धा लोक ओळखतात, ते सध्या मुंबई व पुण्यात आपली क्रिकेटची अकॅडमी चालवतात, मुख्य म्हणजे दिलीप वेंगासकरांच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटर्सला कुठलीही फी द्यावी लागत नाही.

3. मोहिंदर अमरनाथ













1983 च्या विश्वचषकाचे मॅन ऑफ द मॅच व भारतीय संघाचे उप कर्णधार मोहिंदर अमरनाथ निवृत्ती नंतर काही दिवस BCCI च्या निवड समितीमध्ये होते त्यांनतर  सध्या ते क्रिकेटचे एनलिस्ट आहेत पण सहजा ते स्पॉटलाईट पासून लांबच राहतात त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही आहे.

4. क्रिस श्रीकांत















मॅच विनर बॅट्समन  व भारतीय संघाचे तडाखेबाज ओपनर अशी श्रीकांत यांची ओळख, निवृत्ती नंतर ते भारताच्या अ संघाचे प्रशिक्षक बनले व सध्या ते आयपीएल च्या सनराईसर हैदराबाद चे मेंटर आहेत व तमिळ कॉमेंटेटर आहेत.

5.रॉजर बिन्नी














भारतीय संघाचे महत्वपूर्ण गोलंदाज ज्यांनी संपूर्ण विश्वचषकात 18 विकेट्स घेतल्या होत्या, स्टुअर्ट बिन्नी ह्यांचा मुलगा आहे व क्रिकेट अनलिस्ट व होस्ट मयंती लँगर ह्यांची सून आहे, सध्या ते कर्नाटक क्रिकेट असोसिएशन चे सदस्य आहेत.

6.कीर्ती आझाद












1983 च्य विश्वचशकाचे खळखळाट फलंदाज भारतीय संघासाठी काही फारसे खेळले नाहीत, अवघ्या 7 टेस्ट व 35 वन डे त्यांनी भारतासाठी खेळल्या आहेत, क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला, भारतीय जनता पार्टीकडून खासदार सुद्धा झाले मात्र भाजप चे विचार न पटल्यामुळे त्याने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला व सध्या ते काँग्रेस चे खासदार आहेत.

7.बलविंधर संधू












भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर मुंबई व पंजाब रणजी टीम चे प्रशिक्षक झाले त्यांनंतर सध्या ते त्यांच्या मुंबईच्या घरी आरामादेही जीवन जगत आहेत

8. मदन लाल 













भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज ज्यांनी 1983 विश्वचषक फायनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण विव रिचर्ड यांची विकेट घेतली होती, क्रिकेट मधून निवृत्तीनंतर ते BCCI च्या निवड समितीचे सदस्य होते त्यांनतर ते सध्या दिल्ली मध्ये त्यांची क्रिकेटची अकॅडमी चालवतात.

9. कपिल देव 













कपिल देव हे 1983 मध्ये झालेल्या विश्वचशकातील भारतीय संघाचे कर्णधार होते, क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर काही वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले त्यांनतर त्यांची स्वतःची रेस्टॉरंट आहेत त्यातील 11 रेस्टॉरंट चंदीगड मध्ये आहेत व पटना मध्ये त्यांचं एक रिसॉर्ट देखील आहे याचबरोबर ते सध्या हिंदी कॉमेंटर व क्रिकेट एनलिस्ट सुद्धा आहेत.

10.सुनील गावस्कर














सुनील गावस्कर 80 च्या दशकातले एक उत्कृष्ट फलंदाज होते, कपिल देव सारखे ह्यांच आयुष्य सुद्धा निवृत्ती नंतर खूप व्यस्थ राहिले आहे सुनील गावस्कर निवृत्त झाल्यानंतर BCCI चे अध्यक्ष, MCA चे उपाध्यक्ष व चेअरमन ऑफ ICC राहिले आहेत, सध्या ते हिंदी क्रिकेट एनलिस्ट व कॉमेंटर आहेत.

पुढील लेख—>> अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *