“वेदांता पॉपकोर्न” भास्कर जाधवांनी उडवली रामदास कदमांची खिल्ली

भास्कर जाधवांनी उडवली रामदास कदमांची खिल्ली

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची भरसभेत खिल्ली उडवली आहे.

रामदास कदम यांचे मागील सभेतील वेदांता फॉक्सकॉन वरील वक्तव्य आता त्यांची अडचण बनल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

“रामदास कदम बाम वाले, ते त्यादिवशी एकदम थाटामध्ये आले ते म्हणाले ते आदित्य ठाकरे ते काय सारखं बोलताहेत वेदांता फॉक्सकॉन, वेदांता फॉक्सकॉन. आता मी जाऊन वेदांता फॉक्सकॉनवर भाषण करतो.”

“पोरगा म्हटला बाबा आधी वेदांता फॉक्सकॉन बोलायची प्रॅक्टिस करा. कारण हा सारखा वेदांता पॉपकॉर्न, वेदांता पॉपकॉर्न . शेवटी पोरगा बोलला तुम्ही नका बाहेर जाऊन बोलू तो भास्कर जाधव तुमची काय ठेवायचा नाय.”