नवाब मलिक यांनी सध्या एनसीबी च्या विरुद्ध सध्या एका अर्थाने रान उठवले आहे असे दिसून येते. ज्याप्रकारे आर्यन खान व इतर बॉलिवूड मधील व्यक्तींना त्रास दिला जात आहे याचा समाचार आज नवाब मलिक यांनी घेतला.
केंद्र सरकार कशा प्रकारे महाराष्ट्र विकास आघाडी व महाराष्ट्रातील बॉलिवूडला बदनाम करन्यास कार्य करत आहे हे देखील नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
काय बोलले नवाब मलिक?
या बॉलिवूडमध्ये मोठी माणसे जी आहेत त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम एनसीबी च्या माध्यमातून सुरु आहे. खोटे केसेस लोकांवर टाकत आहेत, मीडिया ट्रायलच्या माध्यमातून पब्लिसिटी मिळते त्यांना आणि इतर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याची कामे हे वानखेडे करताहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
आतापर्यंत जी काही कारवाइ केलेली आहे ज्यामध्ये दोन ग्राम, तीन ग्राम असे दाखवले आहे हि सर्व फेक केसेस आहेत. आत कोव्हीड च्या काळामध्ये संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हि मालदीवला होती. माझी माहिती अशी आहे कि लेडी डॉन आणि ह्या कुटुंबाची माणसे मालदीवला होते. आणि तीकडेच सेटलमेंटची कामे करण्यात आली आहेत. असा खुलासा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
आता आर्यनलापण ज्यापद्धतीने एक भाजपच्या आमदाराचा मेव्हणा व त्याचा दोन मित्रांच्या मदतीतून ट्रॅप करून त्याला तिकडे घेउन गेले, कुठल्याही क्रूझवर किंवा क्रूझ टर्मिनलवर कुठल्याही प्रकारचे ड्रग्स जप्त झालेले नाहीत. जे काही फोटो मीडिया ला दाखवले गेले आहेत ते सर्व सॅम्पल समीर वानखेडे यांच्या कार्यालयातले आहेत आणि म्हणूनच हि केस बोगस असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा.