ठाकरे किंवा शिवसैनिक विरुद्ध राणे हा वाद काय आजचा आहे अशातला भाग नाही हा संघर्ष अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या पासून चालत आहे.
ज्या पक्षानी आपल्याला ओळख दिली व मुख्यमंत्री केले त्यांचे उपकार सोडून त्यांच्याबद्दल उलट बोलण्याची सुपारीच नारायण राणे यांनी घेतली आहे असं काहीस चित्र महाराष्ट्रातील जनता पाहत आहे.
प्रहार या मुखपत्रातून राणे रोजच टीकास्त्र सोडत असतात आणि याची मुख्य दिशा मातोश्री म्हणजेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असते.
मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड केली असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे यावर शिवसैनिकांची तिखट प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
काय म्हटले विनायक राऊत?
“एक या भारत देशाच्या लोकशाहीमध्ये लाचार हा शब्द ज्याला शंभर टक्के लागू होतो ती व्यक्ती म्हणजे नारायण राणे. म्हणजे स्वताचा पक्षसुद्धा एक वर्षाच्या आत बुडीत खाती काढला आणि दुसऱ्यांशी लोटांगण घालून लाचारी पत्कारली त्यामुळे नारायण राणेंने इतरांना शहाणपण शिकवू नये. आपण स्वतः काय अनुसरण केलं आहे हि संपूर्ण तुमची प्रतिमा जी उभी केलेली आहे. हे सत्तेसाठी लाचारी, सत्तेसाठी लोटांगण आणि वयक्तिक स्वार्थासाठी हि तुमची प्रतिमा असताना तुम्ही उद्धवजींना शहाणपणा शिकवण्याच्या भांडगडीत पडू नका.”
विनायक राऊत पुढे असे देखील म्हणतात “राणेंच्या या बेताल व्यक्तव्यापेक्षा आम्ही ज्या वेळेला, आदरणीय शरद पवार साहेबानी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले दुपारी २ वाजता बांद्र्याच्या हॉटेलमध्ये जाहीर केले यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा मुळात शिवसैनिक आहेत,शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे उद्धवजी ठाकरे जरी पक्षप्रमुख असले तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री होतोय याचा आभिमान वाटतो.