किरीट सोमय्या म्हणजे भाजपची मुंबईतील सध्याची सर्वात सक्रिय तोफ असे म्हटले जाऊ शकते. गेले बरेच दिवस किरीट सोमय्या छगन भुजबळांवर बेकायदेशीर संपत्ती बाळगण्याचे आरोप करत होते मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली न्हवती. (Kirit somaiya allegation on chagan bhujbal illegal property)
आज दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास किरीट सोमय्या यांनी एक पत्रकार परिषद घेतली व त्यात गंभीर आरोप लावलेत.
छगन भुजबळ ज्या बंगल्यात राहतात ह्या 9 मजली बंगल्याची पैसा कुठून आला हा जो तुमचा बंगला आहे त्याचे मालक तुम्ही परवेज कन्स्ट्रक्शन कंपनी दाखवले आहेत ही कुठली कंपनी आहे आणि याचा तुमच्याशी संबंध काय आहे हे तुम्ही सांगावे असा थेट सवाल सोमय्यांनी भुजबळांना विचारला आहे.
परवेज कंपनी चे मालक भारतीय सरकारच्या अनुसार ज्या कंपन्या दाखवल्या आहेत ह्या कंपन्या सगळ्या बोगस कंपन्या आहेत असा आरोप देखील सोमय्यांनी भुजबळांवर केला आहे.
पनवेल ला 120 कोटींची भुजबळांची बेनामी प्रॉपर्टी देखील इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने जप्त केली मुंबईतल्या सेशन कोर्ट मध्ये गुन्हा दाखल केला आणि या कायद्या अंतर्गत सात वर्षापर्यंत जेल होऊ शकते ही माहिती सुद्धा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार वर ईडी व इनकम टॅक्स च्या धाडी अधिक वेगाने सुरू आहेत तसेच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे आशा वेळेस आघाडी सरकार कडून काय प्रतिउत्तर देण्यात येते हे पाहावे लागेल.