Mayboli.in

स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही पद्धत मुख्यमंत्र्यांनी सोडावी – संदीप देशपांडे

दहीहंडी वर लावलेल्या बंधनावरून मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलीच जुंपली असे आपण समजू शकतो.

महाविकास आघाडी सरकार म्हणण्यापेक्षा मनसेचा जोर जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जास्त दिसून आला असे एकांतरीत चित्र आजच्या दिवसाचे आपण म्हणू शकतो.

tv9 marathi ला दिलेल्या मुलाखातीत मनसे नेते संदीप देशपांडे बोलत होते.

शंभर टक्के जे आमच्या सन्मानीय राज साहेब ठाकरे यांचा जो आदेश होता त्यानुसार सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पूर्ण मुंबईभर दहीहंडी आम्ही साजरी केली. याच कारण असं की सरकार हे दुटप्पी वागतय एक स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि सामान्य लोकांना वेगळा न्याय. आशा दुटप्पी सरकारला त्यांची जागा दाखवायला आम्ही दहीहंडी साजरी करणे महत्वाचे होते.

मनसे नेते संदीप देशपांडे

मुख्यमंत्र्यांनी दुपारी राजठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेताना असे सांगितले की समजदार लोकांना सांगायची गरज नाही अशा भाषेत घेतला होता त्यांनंतरच अशी तिखट भूमिका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतली असावी.

मुलखातीत पुढे संदीप देशपांडे यांना काय टोला लगावला हे खाली दिले आहे.

माझा सन्मानीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना त्यादिवशी घरी बसायला का सांगितले नाही? याचं ज्यादिवशी मुख्यमंत्री उत्तर देतील त्यादिवशी त्यांची सगळी टीका सहन करायची ताकत आहे आमच्यात. स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही पद्धत मुख्यमंत्र्यांनी सोडावी असे खडे बोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावले.

सहजा संदीप देशपांडे यांच्या व्यक्तव्यांवर शिवसेनेचे मोठे नेते प्रतिक्रिया देत नाहीत परंतु इतर शिवसैनिकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आवश्यक आहे.

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Trending Articles

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय?

    प्राकृतिक भूगोल म्हणजे काय? वाचा सविस्तर लेख

    हा लेख प्राकृतिक भूगोलाच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करेल, ज्यामध्ये भूस्वरूप, हवामानाचे स्वरूप, बायोम्स आणि…