Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
Advertisements
महाराष्ट्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 6 ऑगस्ट शाळा उघडण्याची घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की “आम्ही ऑगस्ट 17 पासून इयत्ता 5वी ते 8वी च्या ग्रामीण भागातील शाळा चालू करत आहोत. त्यासोबतच इयत्ता 8वी ते 12वी च्या शहरी भागातील शाळा देखील ऑगस्ट 17 पासून चालू होणार आहेत. (maharashtra school reopen news)
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
अशा वेळेस पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे साहजिकच आहे कारण सध्या कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट चे प्रमाण वाढत चालले आहे आणि हा अधिक घोकादायक असल्याचे समोर आले आहे.
आपल्या मुलांना शाळेत पाठवताना ही काळजी घ्या
- सर्वप्रथम आपल्या मुलांना शाळेत घालवायच्या आधी शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन कमिटी बरोबर चर्चा करून शाळेतील व्यवस्थेतील काळजी बद्दल जाणून घ्या.
- आपल्या मुलांना सतत मास्क वापरायला लावा तसेच सोबत सॅनिटायजर ची बॉटल सुद्धा देत जा जेणेकरून मुले नेहमी स्वच्छ हात ठेवतील.
- जेवणाची सुट्टी, खेल व इतर विशिष्ट कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टनसिंग ठेवले जाते याची खात्री करा.
- कोव्हीड साठी शाळेने काय काळजी घेतली आहे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
- जर तुमची मुले 12 वर्षावरील वयोगटात असतील तर त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
- जर तुमची मुले लसीकरण साठी पात्र नसतील तर शाळेच्या कर्मचाऱ्यां व शिक्षकांसोबत त्यांची कशी काळजी घेऊ शकता यावर आधी मिटिंग करा.
- मुलांना सुरक्षित शाळेत येता जाता येईल अशी त्यांची सोय करा, पब्लिक वाहने सहजा टाळण्याचा प्रयत्न करा कारण पब्लिक वाहने सध्या कोरोनाच्या दृष्टीने जास्त भयानक आहेत.
होय आपण सर्वांना माहिती आहे की शिक्षण व मुलांची सुरक्षितता किती आवश्यक आहे ते. मात्र म्हणूनच हा लेख लिहिण्यात आला जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांची सुरक्षितता बाळगू शकता.
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
Advertisements