Advertisements
राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जिल्ह्यांना कोविड चाचणी व लसीकरण वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे तर दुसरीकडे हे ७ जिल्हे अजूनही कोरोणाच्या लढ्यात अजून यशस्वी होताना दिसत नाही आहेत, याच पार्श्ववभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे.
कोणते आहेत हे ७ जिल्हे ?
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- सांगली
- सातारा
- कोल्हापूर
- हिंगोली
या सर्व ७ जिल्हाच्या कलेक्टर्स सोबत ऑनलाईन मिटिंग मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड चाचणी व लसीकरण वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्वांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात कि “अजूनही दुसरी लाट पूर्णपणे गेलेली नाही म्हणूनच गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या कोव्हिडच्या परिस्थितीनुसार निर्बंध लावले पाहिजेत. कोव्हिडच्या कुठल्या टप्यात आपला जिल्हा येतो त्यानुसार निर्बंध लावले पाहिजेत आणि कोरोना विरोधात सक्षम झाले पाहिजे.
या सोबतच कोव्हीड फॅसिलिटी उभारण्यासाठी जागेची व्यवस्था देखील केली पाहिजे, ऑक्सिजन ची व्यवस्था देखील केली पाहिजे. असेही आदेश मख्यमंत्र्यांनी दिले.
Advertisements