Health Benefits Of Chia Seeds In Marathi – चिया सिड्सचे आरोग्यासाठी फायदे

Health Benefits Of Chia Seeds – चिया सिड्सचे आरोग्यासाठी फायदे

chia seeds health benefits in marathi


चिया सिड्समध्ये असलेल्या पोषक त्वतामुळे चिया सिड्स जगभर खाल्ल्या जातात, चिया सिड्स हे ग्रहातील सर्वात आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या खाद्यपदारर्थां पैकी एक खाद्य आहे.
चिया सुपरफूड आपल्या कॅल्शियमच्या रोजच्या गरजेच्या 20% भाग देऊ शकतात, तसेच चिया बियाने मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा देखील एक चांगला स्त्रोत आहे, आणि त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.
आणखी एक कमालीची गोष्ट म्हणजे सर्व कार्बोहायड्रेट फायबरच्या स्वरूपात असतात, जे पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आज आपण ह्या लेखामध्ये चिया सिड्स चे आरोग्याचे इतर फायदे बघणार आहोत.

Advertisements

दोन चमचे चिया सिडसमध्ये किती पोषक तत्वे असतात

11 ग्रॅम फायबर
 4 ग्राम प्रथिने/प्रोटीन
 9 ग्राम फॅट्स (ओमेगा-3- फॅटी ऍसिड 5 ग्रॅम)

चियामध्ये असलेली फायबरची शक्ती


युनायटेड स्टेट्स डायटरी गाईडलाईन फॉर 2015 ते 2020 मध्ये अस मार्गदर्शन करताहेत की 50 वर्षांखालील पुरुषांनी दररोज 30.8 ग्रॅम (ग्रॅम) फायबर आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांनी दररोज 25.2 ग्रॅम फायबरचे सेवन करावे.
50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांची शिफारस दररोज 28 ग्रॅम असते आणि स्त्रियांसाठी ही दररोज 22.4 ग्रॅम असते. बहुतेक लोक ह्या पेक्षा कमी फायबरचे सेवन करतात.

फायबरचे सेवन वाढविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फळ, भाज्या, काजू, बियाणे आणि प्रक्रिया न केलेले धान्य यासारखे वनस्पती-आधारित अन्नांचा आहार घेणे.  फक्त एक औंस (30 ग्राम) चिया बियाणे 10 ग्रॅम फायबर प्रदान करते.

वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स
Health Benefits Of Chia Seeds In Marathi


फायबर जास्त असलेले अन्न लोकांना पोट भरलेले आहे असे भासण्यास मदत करते, ह्याशिवाय चियामध्ये कॅलोरी देखील कमी असतात जेणेकरून वजन कमी होण्यास मदत होते.
चिया बियाण्यांमध्ये प्रति टेबलस्पुन 5 ग्रॅम फायबर असते यासोबतच त्यांचे ओमेगा-3-फॅटी ऍसिड व लिनोलीक ऍसिड सुद्धा असते जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी चिया सिड्सला पाण्यात घालून फुगवून घ्या जेणेकरून त्या सबज्या सारख्या होतील, ह्या फुगलेल्या बिया पचनास देखील वेळ लावतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


हाडांच्या आरोग्यासाठी चिया सिड्स

Health Benefits Of Chia Seeds In Marathi


चिया सिड्स म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका या छोट्याशा दिसणाऱ्या चिया सिड्समध्ये फॉस्फरस, प्रथिने आणि कॅल्शियम यासारखे बरेच पोषक तत्व असतात.
चिया बियाण्यामधील कॅल्शियम आपल्या हाडांना मजबुती देतात व नियमित सेवन केल्याने हाडे भरीव होतात व अस्थीरोग देखील होत नाही.

अँटिऑक्सिडंट्स मध्ये उच्च चिया सिड्स

अँटिऑक्सिडंट्स कर्करोगा पासून मुक्तता देण्यासाठी ओळखले जातात जे शरीरातील कर्करोगाला कारणीभूत असलेल्या फ्री रॅडीकल्स बरोबर लढतात.
चिया सिड्स अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असल्याने त्यांचे जास्तीत जास्त सेवन केले जाऊ शकते,

ह्रदय विकारांवर मात करण्यासाठी चिया सिड्स

Health Benefits Of Chia Seeds In Marathi


चियाच्या बियां मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स ह्रदयाला चांगले असतात जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी लाभदायी आहे तसेच रक्तदाब कमी करतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात.

दातांची निगा राखण्यासाठी लाभदायक चिया सिड्स
चिया मध्ये असलेले उच्च कॅल्शियम दातांसाठी पोषक आहे, तसेच चिया बियाणे आपल्या दातांसाठी लाभदायक खाद्य आहे.  चिया बियामध्ये असलेले झिंक दाढेची निगा ठेवण्यास मदत करते व चियातील अँटीबैक्टीरियल गुणधर्मामुळे तोंडाचा दुर्गंध नियंत्रित करण्यास देखील मदत होते.

गरोदरपणात पोषक चिया सिड्स 

Health Benefits Of Chia Seeds In Marathi


गरोदर असलेल्या महिलांनी चिया बियाण्यांना त्यांच्या दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून समाविष्ट केले पाहिजे कारण ते केवळ आईच्या आरोग्यासच नव्हे तर बाळाच्या वाढीस देखील मदत करते. चिया सिड्स ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे उच्च स्त्रोत असल्याने, ते बाळाच्या मेंदूच्या वाढीस मदत करतात आणि आईतील गमावलेले पोषक द्रव्य पुन्हा भरण्यास मदत करतात.

वाचा गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे


इतर लेख
वाचा चिया सिड्स दही भात अस्सल रेसिपी – Chia Seeds Recipe In Marathi
वाचा Beauty Hair Care Tips at Home In Marathi : केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती उपाय
वाचा संधिवात व गुढघे दुखीवर आयुर्वेदिक उपाय – Joint Pain Home Remedy’s in Marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *