ह्या कारणामुळे दादा ने लॉर्ड मैदानावर फिरवली होती टी-शर्ट जाणून घ्या सम्पूर्ण स्टोरी


सौरव गांगुलीला सगळे दादा म्हणायचे आणि तो खरच दादा होता. दादा ने त्याच्या करियर मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लड, वेस्ट इंडिज व इतर स्लेजिंग करणाऱ्या देशांना चांगलीच अद्दल घडवली अगदी रोखठोक स्वभाव असणाऱ्या दादाची सर्वात लक्षात राहणारी करामत म्हणजे 2002 मध्ये लॉर्ड मैदानात बाल्कनी मधून फिरवलेली टी शर्ट आज आपण जाणून घेऊयात नेमकं अस काय झालं होतं ज्याने दादाला असे करायला भाग पाडले.

Advertisements
2002 इंग्लंड टूर ऑफ इंडिया
जानेवारी 2002 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड 6 एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली, अत्यंत रोमांचकारी पहिला सामना भारताने 22 धावांनी जिंकला तर दुसरा सामना इंग्लंड ने 16 धावांनी जिंकला, तीसऱ्या सामन्यात भारत पहिली फलंदाजी करत अवघ्या 217 धावा करूनसुद्धा गोलंदाजी च्या जोरावर 20 धावांनी हा सामना जिंकतो तसेच चौथ्या सामन्यात देखील भारत इंग्लडला अक्षरशः धूळ चारत 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवतो त्यांनतर अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत चालणारा पाचवा  सामना इंग्लंड अवघ्या दोन धावांनी जिंकतो.
आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने झाले होते व भारत 3-2 च्या आघाडीवर होता त्यामुळे इंग्लंड चा संघ प्रचंड दबावामध्ये होता.

3 फेब्रुवारी 2002 मुंबई वानखेडे येथे शेवटच्या सामन्याला सुरुवात होते इंग्लंड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेते, भारतिय गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडला 255 धावांवर रोखतात ह्या सामन्या मध्ये हरभजन सिंग चा मोलाचा वाटा आहे त्याने इंग्लंडचे पाच फलंदाज बाद केले, मग सुरुवात होते भारताच्या फलंदाजीला. सचिन अवघ्या 12 धावा करून बाद होतो व सर्व भार सौरव गांगुली म्हणजे दादा वर येतो दादा ह्या सामन्या मध्ये 80 धावा करून बाद होतो व भारतीय संघाची मधली फळी डगबघते, हेमंग बदामी एका बाजूने चांगला खेळ करत असतो मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नसते अशाप्रकारे सामना शेवटच्या ओव्हर मध्ये जातो व भारताला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11 धावा हव्या होत्या, इंग्लडकडून एन्द्रीव फ्लिंटॉफ हा गोलंदाज असतो व फलंदाजी करत असतो अनिल कुंबळे, पहिल्या चेंडूवर जोरदार मारा करत कुंबळे 2 धावा काढतो,दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव काढून हेमंग बदामी स्ट्राइक वर येतो आता भारताला जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 9 धाव हव्या असतात तिसऱ्या चेंडूवर जोरदार धाव घेत हेमंग बदामी व अनिल कुंबळे दोन धावा घेतात व चौथ्या चेंडूवर अनिल कुंबळे धावबाद होतो आता फक्त दोन चेंडू उरलेले असतात व भारताला सहा धावांची गरज असते व भारताची शेवटची विकेट उरलेली असते आशा वेळी जवागर श्रीनाथ पहिलाच चेंडू खेळत असतो व फ्लिंटॉफ त्याचा त्रिफळा काढतो आणि इंग्लड सामना जिंकतो. फ्लिंटॉफ अंगावरची टी शर्ट काढून हवेत फिरवत तो सम्पूर्ण मैदानावर फिरतो, ह्याच क्षणी सौरव गांगुली ने ठरवले होते फ्लिंटॉफ ला जशास तसे उत्तर द्यायचे.


शनिवार 13 जुलै  2002 नॅटवेस्ट सिरिस फायनल सामना (फ्लिंटॉफच्या परतफेडीचा दिवस )यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतासमोर 326 धावांचे लक्ष ठेवले.

बलाढ्य लक्षाचा पाठलाग करताना भारतीय ओपनर्स ने अगदी हवी तशी साथ दिली सेहवागने 45 तर दादा ने 65 धावा बनवल्या त्यांनतर युवराजने 69 तर मोहम्मद कैफ ने नाबाद 87 धावा केल्या.
युवराज बाद झाल्यावर मोहम्मद कैफ एक बाजूने धावा काढत होता मात्र दुसऱ्या बाजूला खेळाडू साथ देत न्हवते,शेवटच्या 18 चेंडू मध्ये भारताला 16 धावा हव्या होत्या व गोलंदाज होता फ्लिंटॉफ त्याने पहिल्याच चेंडू वर हरभजन सिंगला बाद केले व तिसऱ्या चेंडूवर कुंबळे ला बाद केले आता भारताकडे फक्त 2 विकेट्स उरल्या होत्या.
सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकत होता मात्र मोहम्मद कैफ ने उत्कृष्ट अशी फलंदाजी करत सामना 6 चेंडू मध्ये 7 धावांवर आणला व शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद कैफ ने भारताला विजयी केले आणि सुरू होतो खरा थरथराट दादा लॉर्ड च्या बाल्कनीतून सामना बघत असतो सोबत लक्ष्मण,द्रविड,हरभजन सुद्धा असतात, वानखेडे मध्ये फ्लिंटॉफ ने फिरवलेल्या टीशर्ट चा बदला घेण्याची हीच ती वेळ समजून दादा ने सुद्धा टी शर्ट काढून फिरवली त्याला लक्ष्मण अडवत होता मात्र दादा कोणाचे ऐकतोय होय मागे उभा असलेला हरभजन ने दादा ला विचारले मी काय करू तर दादा म्हणाला तू पण काढ आणि हरभजन सुद्धा टी शर्ट काढणार इतक्यात त्याला राहुल द्रविडने त्याला अडवले.
आशा प्रकारे दादा ने दाखवून दिले जर लॉर्ड च मैदान तुमचं मक्का आहे तर वानखेडे मैदान भारतीय संघाचे मक्का आहे.                     Paytm Zomato Swiggy Ola Oyo ?

Advertisements