आपल्या चवीने जगाला वेड लावणारं पेय म्हणजे कॉफी,
रिसर्च तर असं सांगत की कॉफी पिणारे लोक जास्त जगतात व त्यांना ह्रदयविकार पण कमी होतात, कॉफी ही कॉफीच्या झाडांच्या भाजलेल्या बियांपासून बनवली जाते, कॉफीच मूळ झाड इथिओपिया मधील हरार या शहरातून आल्याच विकिपीडिया सांगते.
तर लेडीज आणि जेंटलमनानु इतर चर्चेवरून आपण आपल्या मूळ गोष्टीवर येऊयात, जगातील पहिली कॉफी.
9 व्या शतकातील ८५० एडी मधील ही गोष्ट आहे, कलदी किंवा खालिद असे ह्या इसमाचे नाव ज्याने कॉफीचा नकळत शोध लावला, खालिद हा मूळचा इथिओपिया मधील हरार ह्या शहरात नागरिक होता, खालिदचा बकऱ्या व शेळ्यांचा व्यवसाय होता,
एकदा आपल्या बकर्यांना रानामध्ये फिरवत असताना त्याला पहिल्यांदा मातेरी आणि गडद लाल रंगांची छोटी फळे दिसली
आणि ती नेमकी काय असावीत याचा शोध लावण्यासाठी त्याने ती खाऊन पाहिलीत, पहिल्यांदा त्याला ती कडू लागलीत मात्र त्याला हे जाणवलं की ह्या फळांपासून त्याला प्रचंड ऊर्जा आल्यासारखे वाटू लागलं, काही दिवसानंतर त्याला ही फळे पुन्हा दिसलीत व त्याने ह्या फळांचं रोज सेवन चालू केलं हळूहळू त्याला ह्या फळांच्या फायद्यांचा अनुभव येऊ लागला,
ह्या फळांच्या फायद्यांचा विश्वास बसल्यावर तो ही फळे एका भिक्षु किंवा आपण त्याला साधू सुध्दा म्हणू शकतो त्याच्याकडे घेऊन गेला व साधू ला सांगू लागला की ह्या फळांपासून त्याला प्रचंड ऊर्जा येते व इतरही फायदे होतात असे सांगू लागला, परंतु साधू ला एखादा बकऱ्या चारणारा माणूस असा शोध लावेल असा विश्वास बसला नाही व त्याने खालिद चे म्हणणे न ऐकून घेता त्या बिया आगीमध्ये टाकल्या, आगीमध्ये टाकल्यावर एक मोहक सुगंध कॉफीच्या बियांमधून बाहेर पसरू लागला, तो सुगंध घेत इतर बाजूचे साधू तिथे जमा झाले त्यांनी त्या अर्धभाजलेल्या बिया आगीतून काढून त्यांचा चुरा करून गरम पाण्यात मिसळून त्यांचं पेय बनवलं !!!
तर अशा मजेदार पद्धतीने जगातील पहिली कॉफी बनली जिचे पुढे जाऊन बरेचसे प्रकार बनले, जसे की कॅप्पूसिनो, अमेरिकानो, एस्प्रेसो, मासिसिआटो, मोचा, लॅट्टे …
तर लेडीज आणि जेंटलमनानु तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून कळवा आपण असेच मजेदार ब्लॉग घेऊन तुमच्यापर्यंत येत राहू त्यासाठी तुम्ही आपल्या पेज ची सदस्यता घ्या…
धन्यवाद 