एक कप म्हणजे किती औंस याचे उत्तर शोधताय? होय ना. मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आलेला आहात कारण आजच्या लेखात आपण पाहणार आहोत औंस या मापक बद्दल.
एक कप म्हणजे किती औंस?
साधारण मापकामध्ये एक कप म्हणजे आठ (८) औंस होय. काही कप मोठे देखील असू शकतात मात्र आपल्या घरातील सामान्य कप ची मात्रा औंस मध्ये ८ औंस अशीच होते.
तसेच आठ औंस म्हणजे २३६ मिलिलिटर होय. याचा अर्थ एका कपमध्ये २३६ मिलिलिटर एवढे पाणी असते.
- एक कप = ८ औंस
- दोन कप = १६ औंस
- तीन कप = २४ औंस
- चार कप = ३२ औंस
- पाच कप = ४० औंस
- सहा कप = ४८ औंस
- सात कप = ५६ औंस
- आठ कप = ६४ औंस
- नऊ कप = ७२ औंस
- दहा कप = ८० औंस
वाचा – क्षेत्रभेट म्हणजे काय?
औंस म्हणजे काय?
औंस हे वस्तुमान, वजन किंवा आकारमानाच्या अनेक भिन्न एककांपैकी कोणतेही एकक आहे आणि ते मोजमापाचे प्राचीन रोमन एकक uncia पासून जवळजवळ अपरिवर्तित आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या बिंदूंवर आणि वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी, औंस (किंवा त्याचे भाषांतर) वस्तुमानाच्या विस्तृत प्रमाणात समान परंतु तरीही थोड्या वेगळ्या मानकांचा संदर्भ देते.
औंस चे वाक्यप्रयोग
- या ग्लासात कमीत कमी ३ ते ४ औंस पाणी भरलेले असेल, हवे तर तू मोजून बघ.
- हि रेसिपी बनवण्यासाठी मला कमीत कमी २ औंस सफरचंदचा रस लागणार आहे, म्हणून तू लवकर जा आणि चांगले सफरचंद घेऊन ये.
- मुख्य बाजारात आज पाण्याची पाईप लाईन फुटली म्हणून कमीत कमी ४०००० औंस पाणी वाया गेले असावे.
- तुला जर जमले तर बाजारातून येताना मला ती ८ औंस कोल्ड्रिंक ची बॉटल घेऊन ये, मला खूप प्यावीशी वाटतेय.
- जर या बॉटलमध्ये ५ औंस पाणी असेल तर तुम्ही रोज एवढेच पाणी पिणार आहात का?