९ ऑक्टोबर २०२२, शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात सभा ठाणे येथे घेण्यात आली. या सभेत अनिता बिर्जे, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, केदार दिघे आणि विनायक राऊत यांची उपस्थिती होती.
आता नारायण राणे आणि शिवसेना हा वाद आपण सर्वाना माहिती आहे. राणेंची पत्रकार परिषद असली किंवा शिवसेनेची सभा दोन्ही बाजूनी तुफान फटके बाजी होते हे निश्चित असते.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात सभा ठाणे इथे झाली यामध्ये बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले विनायक राऊत?
कोण म्हणतो दीड फुट्या कोण म्हणतो कोंबडी चोर. एकदाच संपवलं, एक नव्हे तर दोन वेळा विधानसभेला आपटीबार केला. मी लोकसभेला त्या कार्ट्याला दुसऱ्या दाखवली जागा. आता हिम्मत असेल तर अजून एकदा या हिज्या विज्या तिज्या करून टाकू.
राणेंबद्दल अशी बोचरी टीका यापूर्वी कोणी केली नसेल. म्हणूनच आता नारायण राणे विनायक राऊतांना काय उत्तर देतील याची देखील आतुरता आपल्या वाचकांना राहील.