सुषमा अंधारेंचे पंतप्रधान नरेन्द्र मोदींना खडेबोल त्यांच्या आश्वासनाची करून दिली आठवण

पंतप्रधान नरेन्द्र मोदींना खडेबोल

९ ऑक्टोबर २०२२ ठाणे इथे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली. या सभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

Advertisements

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची महत्वपूर्ण जबाबदारी सुषमा अंधारेंकडे देण्यात आली असून त्यांनी सुरुवात जोशपूर्ण झाल्याची टिपणी पहिल्या सभेत केली.

सुषमा अंधारे सभेत मोदींची मिमिक्री करत बोलतात “भाई और बेहणो मै आपसे मन कि बात करुंगा” त्या पुढे म्हणतात कोणी बोलायला यायलय, कोणी मन कि बात करायला यायलय. अरे जण कि बात कब सुनोगे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

सुषमा ताई पुढे म्हणतात “भारत हा एक प्रोडक्टीव्ह पॉप्युलेशन चा देश आहे, गरज होती या प्रोडक्टीव्ह पॉप्युलेशन ला उद्योगधंदे आणि रोजगार देण्याची आणि हाच मुद्दा डोक्यात ठेवत २०१४ ला या लोकांनी (भाजप पार्टी ने) असे सांगितले होते कि दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्यात येतील मात्र तस करण्यात हे सपशेल अपयशी ठरले कारण इथे अर्थनीती फसली, इथे नियोजन फसले, इथे इम्पलेमेंटेशन फसलं आणि याचा सगळ्यात मोठा जो फटका बसला तो आमच्या सगळ्या तरण्या पोरा पोरींना बसला.”

सुषमा ताईंनी सध्या भारतातील असलेल्या सर्वात मोठ्या समस्येवर भाष्य केले हे कौतुकास्पद आहे. जे मुद्दे मुख्य मीडिया वगळत आहे तिथे सर्व सामान्य जनतेने आपले प्रश्न मांडले पाहिजे हे लोकशाहीचे सूत्र आपण सर्वानी हातात घ्यावे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *