शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची भरसभेत खिल्ली उडवली आहे.
रामदास कदम यांचे मागील सभेतील वेदांता फॉक्सकॉन वरील वक्तव्य आता त्यांची अडचण बनल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
“रामदास कदम बाम वाले, ते त्यादिवशी एकदम थाटामध्ये आले ते म्हणाले ते आदित्य ठाकरे ते काय सारखं बोलताहेत वेदांता फॉक्सकॉन, वेदांता फॉक्सकॉन. आता मी जाऊन वेदांता फॉक्सकॉनवर भाषण करतो.”
“पोरगा म्हटला बाबा आधी वेदांता फॉक्सकॉन बोलायची प्रॅक्टिस करा. कारण हा सारखा वेदांता पॉपकॉर्न, वेदांता पॉपकॉर्न . शेवटी पोरगा बोलला तुम्ही नका बाहेर जाऊन बोलू तो भास्कर जाधव तुमची काय ठेवायचा नाय.”
वेदांता फॉक्सकॉन बद्दल आमचे मत
वेदांता फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून जाणे हे अत्यंत दुर्देवी आहे, यानिमित्ताने सुमारे दीड ते दोन लाख थेट नोकऱ्या येण्याची शक्यता होती.
वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गेल्यावर मुख्यमंत्री यांनी एक भाष्य केले ते म्हणजे यावूनही एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येईल मात्र हा प्रकल्प वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले हे सांगितले असते तर लोकांचा विश्वास अजून वाढला असता.