शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या सेम नावाची मागणी इलेक्शन कमिशन कडे केल्याने विनायक राऊत आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी फेसबुक लाईव्ह येऊन तीन नावाची मागणी केली होती जी म्हणजे:
- शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
विनायक राऊत काय म्हणाले?
“या समोरच्या गद्दार पार्टी ने कितीही उपद्व्याप जरी केले, कितीही जरी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही मागितलेल्या नावावर त्यांनी पुन्हा आपलं तीच नावे मागण्याचा जरी घाणेरडा नीच असा प्रयत्न केला तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे हा एक जो ब्रँड आहे आणि हे जे सगळ्या लोकांच्या मनामध्ये हे नाव जे कोरले आहे हे कोणी पुसून टाकायचे प्रयत्न करू शकता नाही किंबहुना ते कोणीही खोक्याने विकतही घेऊ शकत नाही.”
निश्चितच शिंदे गटाची नवीन नावाची खेळी मुख्य शिवसेनेच्या जिव्हारी लागलेली दिसत आहे. आता इलेक्शन कमिशन यावर काय निर्णय घेतो हे पाहण्याचे महत्वाचे राहील.