मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगरच्या सभेवर काय म्हणाले संजय राऊत
“आज मराठवाड्यामध्ये शिवसेनेची जी पहिली शाखा ३७ वर्षांपूर्वी स्थापन झाली त्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगरला शिवसेनेची सभा आहे. या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. सभेची तयारी गेल्या काही काळापासून जोरात सुरु आहे आणि मराठवाड्यातून लाखों शिवसैनिक या सभेला येतील कारण बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच सभा घेत आहेत याच एक वेगळं आकर्षण आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
विरोधकांचे तोंड हे गटार ~ Sanjay Raut
“हे बघा, विरोधकांचे जे तोंड आहे ते तोंड अजून गटार आहे” असे वक्तव्य संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या विरोधकांना संबोधण्यास केले आहे. ते पुढे म्हणतात “राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत काय बोलावं, कस बोलावं याच भान त्यांनी ठेवावे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाबद्दल तुमचा द्वेष असू शकतो. त्यांनी जे काही मोठे काम करून ठेवलंय त्याविषयी तुमच्या तोंडातून असे विजलेले पठाके निघणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही.”
महाविकास आघाडीत नाराजी आहे का?
“सरकार स्थापण करताना जे घटक पक्ष आमच्या सोबत होते ते आजही आमच्या बरोबर आहेत. कालच माननीय शरद पवार अस्तिल किंवा मुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे. कि काही लहान-सहाण गोष्टी असतात तर त्या कोणाच्या राहिल्या असतील तर त्या सुद्धा होतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक घटक पक्ष महाविकास आघाडीतला आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे.” असे मत संजय राऊत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांची नाराजीच्या प्रश्नावर दिले.
सेकुलर झाले तर मत देऊ - अबू आझमी यांची शिवसेनेला अट
संजय राऊत यांनी अबू आझमी यांच्या अटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “ठीक आहे, १० तारखेला कोण कोणाला मत देतं हे दिसून येईल. याबाबतीत त्यांच्या प्रमुख नेत्यांबरोबर आमची चर्चा झालेली आहे. शेवटी महाराष्ट्राचे सरकार हे कॉमन मिनिमम प्रोग्राम वर चालू आहे.”
मनसेला बाळासाहेबांच्या फोटोची एलर्जी आहे का? संजय राऊतांचा सवाल
“मग कोणाचा लावायचा? मनसेला बाळासाहेबांच्या फोटोची एलर्जी आहे का?” असा खडा सवाल मनसेला संजय राऊत यांनी केला आहे. मनसैनिक सतत शिवसेनेवर बाळासाहेबांचा वापर करण्याचा आरोप करत असतात. “आपण सुद्धा त्यांचाच फोटोच लावत होता, सुरुवातीच्या काळात.” अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
सुभाष देसाईंचा पत्ता कट?
संजय राऊत यांनी सुभाष देसाईंचा पत्ता कट केला या विषयावर देखील संभोधन केले. “पत्ता कट हा शब्द चुकीचा आहे, सुभाष देसाई असतील किंवा दिवाकर रावते असतील हे पक्षातील जेष्ठ नेते आहेत. त्यांनी वर्षनुवर्षं पक्षाचे काम केले आहे. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे राहील.”