प्रत्येक मराठी माणसाला मराठी डीजे गाणे नेहमीच नाचायला लावतात यात काही वाद नाही.
सवारी भवानी चौकामधी, नाद निनादला, वो बुलाती है मगर जाणे का नही, पिवळा पितांबर, मारी, खंडोबा रायाचं हे सर्व फेमस डीजे गाणे, डीजे सॉन्ग आहेत जे नेहमीच सर्वच नाचायच्या कार्यक्रमात लागतात.
गणेशोत्सव, शिवजयंती, भीमजयंती, होळी असो व शिमगा या सर्वच कार्यक्रमात डीजे गाणे नेहमीच वाजतात, याव्यतिरिक्त सर्व लोकांना हि गाणी नेहमीच डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवण्याचा शोक असतो. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही टॉप १० डीजे गाणे घेऊन आलेलो आहोत.
हा लेख बघा – टॉप १० मराठी गाणे
1.सवारी भवानी चौकामधी
सवारी भवानी चौकामधी हे मराठी डीजे गाणे शिवरायांचे गीत आहे, जबरदस्त बिट्स असलेले हे सॉंग नेहमीच ऐकावेसे वाटते. हे गाणे वाजल्यावर नेहमीच नाचायला भाग पाडते.
2.वो बुलाती है मगर जाणेक नही
वो बुलाती है मगर जाणेका नही हा अजून एक भन्नाट वाजणारा डीजे सॉन्ग येड लावणारे गाणे आहे. कित्तेक वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे हे गाणे नेहमीच तालावर थिरकायला लावते.
3.ओ शेठ
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे सर्व युवा वर्गाच्या तोंडावर असणारे डीजे गाणे आहे. याचे बिट्स व म्युसिक अशे आहेत कि लगेचच कोणालाही नाचायला लावतील. तुम्हाला हवे तसे नाचण्यासाठी हे नंबर वन गाणे आहे.
4.एकच वादा राजू दादा
एकच वादा राजू दादा हे गाणे मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर लिहिले गेले आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात डीजेवर वाजणारे असे गाणे झालेले आहे. हे एक सॉन्ग असे आहे जे प्रत्येक मराठी माणसाला ठेका धरायला लावते.
5.दैवत छत्रपती
दैवत छत्रपती – होय खरच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे डीजे सॉन्ग प्रत्येक शिवजयंतीच्या रॅली मध्ये वाजते याचे कारण शिवरायांवरचे प्रेम व गाण्यात असलेले बिट्स जे राज्याच्या जयघोषात नाचायला लावतात.
6.नशिबाचा वडापाव
नशिबाचा वडापाव हे आणखी एक जबरदस्त वाजणारे डीजे गाणे आहे. हेडफोन्स किंवा मोठ्या साउंड सिस्टीम वर ऐकायला हे एकदम भारी गाणे वाटते. हे गाणे सुद्धा प्रत्येक डीजे गाणे ची प्लेलिस्ट मध्ये असणे आवश्यक आहे.
7.श्रीवल्ली
पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है! फेमस पुष्पा पिच्चर मधील हे डीजे गाणे जबरदस्त मराठी धून वर रिमिक्स केले आहे. एकदा ऐकून पहा कसे वाटतंय ते बघा.
8.युगत मांडली
पास्वानखिंड मधील सध्या जबरदस्त गाजलेले युगत मांडली हे गाणे एकदम जबरदस्त असे डीजे गाणे आहे. खालील दिलेले हे सॉंग डीजे वाल्याने जबरदस्त रिमिक्स केलेले आहे.
9.पिवळा पितांबर
पिवळा पितांबर हे एक चाबूक वाजणारे भीमगीतं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित हे गीत एक जबरदस्त डीजे गाणे आहे. प्रत्येक डीजे चाहत्यांनी हे ऐकावे असे गाणे आहे.
10.गाडी घुंगराची
शाहीर रामानंद यांनी गायलेले हे गाणे गाडी घुंगराची हे डीजेवर जबरदस्त वाजते. हे गाणे नेहमीच ऐकण्यासारखे आहे व अप्रतिम आवाज हे अजून भारी वाटते.
तर मित्रानो अशा प्रकारे डीजे गाणे, डीजे सॉन्ग हा लेख इथेच थांबवत आहोत. आशा करतो कि हा लेख तुम्हाला आवडला असेल व तुम्हाला हवी असलेली गाणी भेटली असतील.