महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जगाच्या इतिहासातील निष्ठावंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कर्नाटकी सरकार किंवा तिकडचे लोक नेहमीच गलिच्छ प्रकारची कारस्थाने करीत असतात.
बेळगाव या सीमाप्रांतात हल्लीच पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रसंग बाहेर आला आहे. यालाच प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांच्यावर भाजप शाशित कर्नाटक सरकारने बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत असे आरोप संजय राऊत यांनी भाजप सरकार वर केले आहेत.
या सर्व घडामोडींचा समाचार राऊत यांनी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत घेतला.
काय म्हणाले शिवसैनिक संजय राऊत ?
१२ डिसेम्बर रोजी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणतात, “सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज, संघर्ष यांचं प्रतिनिधित्व ती १७ वर्षे करते. त्यासाठी त्यांनी रक्त सांडलं आहे,बलिदान दिलेले आहे. २० लाखांपेक्षा अधिक मराठी बांधव तिथे आहेत. हि सामान्य ताकद नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार विटंबना होते त्याविषयी देशभरात संताप आहे.”
गेल्या काही दोन दिवसात कर्नाटक सरकार ने २०० हुन अधिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीर अटक केले आहे आणि पोलीस त्यांना मारत आहेत,त्यांची डोकी फोडत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रातील संवेदनशील भाजप चे नेते काय करत आहेत. एकीकरण समितीवर बंदी आणण्याची भाषा ठीक आहे पण ती बंदी घालून दाखवावी असे खुले आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते व सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी भाजप शासित कर्नाटक सरकार ला दिले आहे.
बेळगाव व कर्नाटक सीमेवर मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात होण्यासाठी सरकारचे अनेक वर्षांपासून प्रयत्न चालू असून हे प्रकरण सध्या कोर्टाच्या दारात आहे आणि लवकरच याचा निकाल महाराष्ट्राच्या पदरात पडेल अशी mayboli.in तर्फे प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र …