क्षेत्रभेट म्हणजे काय?
क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच आपन शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात.
Advertisements
क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देने होय, उदाहरणार्थ आपण सहलीला एखादा किल्ला बघायला गेलो तर त्याला प्रतापगड क्षेत्रभेट म्हटण्यात येऊ शकते.
क्षेत्रभेट व सहल मधला फरक काय आहे?
सहल म्हणजे एक नुसती मनोरंजक ट्रिप असते तर दुसऱ्या बाजूला क्षेत्रभेट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला तिथे चाललो आहोत.
उदाहरण: प्रतापगड पहायला जाने म्हणजे सहल आणि प्रतापगडावरील वास्तूंचा अभ्यास करने म्हणजे क्षेत्रभेट होय.
क्षेत्रभेट कशासाठी केली जाते?
- क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या इतिहासबाबत, तिथल्या संस्कृती बाबत, तिथल्या भूगोलाबाबत अभ्यास केला जाऊ शकतो.
- क्षेत्रभेटीद्वारे त्या क्षेत्रातील पर्यावरणाचा अभ्यास केला जाऊ शकतो, तेथील नैसर्गिक संपत्तीचा अभ्यास केला जाऊ शकतो.
- क्षेत्रभेटीद्वारे त्या क्षेत्रातील नवीन रहस्ये समोर येऊ शकतात किंवा एखादी नवीन गोष्ट शोधली जाऊ शकते.
- क्षेत्रभेटीद्वारे त्या क्षेत्रातील राहणाऱ्या मानवांच्या राहणीमान कळून येते तसेच त्यांची परंपरा देखील दिसून येते.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य काय लागतात?
क्षेत्रभेटीसाठी खालील साहित्य असणे अतिशय आवश्यक आहे;
- क्षेत्राच्या दिशा ठरवण्यासाठी होकायंत आणि सपशील नकाशे,
- सापडलेली माहिती नोंद करण्यासाठी वही, पेन, पेन्सिल, दुर्बीण, मोजपट्टी इत्यादी,
- क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी प्रश्नोत्तरे,
- क्षेत्रातील माहीती व नमुने गोळा करून नीट घेण्यासाठी पिशवी आणि मार्कर,
- स्वतःसाठी टोपी, पाण्याची बॉटल, खाण्याचा डबा, फर्स्ट एड किट.
क्षेत्रभेटी दरम्यान करावयाचे कचऱ्याचे व्यवस्थापन
- क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या पिशव्या किंवा गोनी सोबत घेने.
- क्षेत्रभेटी दरम्यान आलेल्या सर्व मुलांकडून कचरा होणार नाही याची खबरदारी घेणे व सोबतच झालेला कचरा सर्व जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी.
- क्षेत्रभेटी दरम्यान फलक व घोषणा वापरून संबंधित क्षेत्रात साफसफाई करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली
- भेट देणाऱ्या वस्तूची स्थपणा कुठल्या वर्षी झाली?
- वास्तुवर काय कार्य व्हायचे व त्याची सध्याची स्थिती काय आहे?
- वास्तूच्या परिसरात त्यावेळी किती लोक रहायचे आणि आता किती लोक राहतात?
- क्षेत्रभेटीची जागा कशासाठी लोकप्रिय आहे?क्षेत्रभेटीच्या जागेचा इतिहास काय आहे?
- तिथल्या जागेची सरकारने काय काळजी घेतली आहे?
- क्षेत्रभेटीच्या जागेचा नकाशा बरोबर आहे का त्यात काय बदल हवे आहेत?
महाराष्ट्रातील क्षेत्रभेटीसाठी प्रसिद्ध ठिकाणे कोणती आहेत?
1.महाराष्ट्रातील गड किल्ले (रायगड,शिवनेरी,प्रतापगड)
2.अजिंठा लेणी
4.एलिफंटा
5.कास पठार
6.लाल महाल
7.अभयारण्ये
Advertisements