आज सकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संजय राऊत असे म्हणतात कि “आणीबाणीला विसरा आता. कोणीही त्याचा बाऊ करु नये.. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी वाटते.”
आज सकाळी महाराष्ट्राचे माजी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या या कारवाई नंतर शिवसेनेचे खासदार यांनी भडकून हि प्रतिक्रिया दिली असे दिसून आले. ‘सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?’ असा सवाल देखील त्यांनी केंद सरकारला विचारला.
काल महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी अजित दादांची सीबीआय चौकशी करावी असी मागणी केली यावर उत्तर देत संजय राऊत असे म्हणतात कि अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार अयोध्येच्या महापौरांनी केला आहे त्या केसची सीबीआय ने चौकशी करावी. ती केस सीबीआयसाठी फिट आहे, असा घनघाणीत टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
राज्यातील मोठमोठ्या नेत्यांवर ईडी,सीबीआय अशा शासकीय यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच घडलं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. विनाकारण त्रास हा शब्द सरनाईक यांच्या पत्रात देखील होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही आहे, अशी आठवण राऊतांनी करुन दिली.
इडी चे छापे,सीबीआय चौकशी मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे असेही राऊत म्हणाले.