Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
Advertisements
दही भात म्हटला तर कोणाला आवडत नाही पण त्यासोबत चिया सिड्स असल्या तर त्याची चवच लय न्यारी, अशीच एक मजेदार अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी आज आपण बघणार आहोत, अस्सल महाराष्ट्रीयन म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना आवडेल असं बरं का
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
चिया सिड्सचे आरोग्याला फायदे
- चिया सिड्सच्या 2 मोठ्या चमच्यामध्ये 137 कॅलरी असतात तसेच
- फायबर (Fiber) : 11 ग्रॅम
- प्रथिने (Protein) : 4 ग्रॅम
- चरबी (Fats) : 9 ग्राम (त्यापैकी 5 ग्राम ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात)
Source : Healthline
चिया सिड्स दही भाताचे फायदे
- फायबरचे प्रमाण जास्त – रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्टेरॉलची पातळी आणि आतडे आरोग्यासाठी चांगले
- उच्च प्रथिने – मसल्स बनवण्यासाठी चांगले
- हेल्दी फॅट्स – आपल्याला संतुष्ट होण्यास मदत करण्यासाठी चांगले
चिया सिड्स दही भातासाठी लागणारे साहित्य
2 चमचे चिया सिड्स
½ कप दही किंवा हंग दही
चवीनुसार मीठ
2 चमचे कोथिंबीर चिरलेली
तडक्यासाठी लागणारे साहित्य
1 चमचे तूप किंवा खोबरेल तेल
2 चमचे कच्चे शेंगदाणे
1 चमचे मोहरी
2-3 लाल मिरच्या
2 कदीपत्याची पाने
1 चमचे आले, किसलेले
एक चिमूटभर हींग (पर्यायी)
चिया सिड्स दही भात कसा बनवायचा
2 चमचे चिया सिड्स फुलण्यासाठी1 कप पाण्यात कमीत कमी 1-2 तास ठेवावे किंवा गरम पाण्यात 30 मिनिटांसाठी ठेवावे.
तडका
कढईत तूप किंवा खोबरेल तेल गरम करा व तेल गरम झाल्यावर कच्चे शेंगदाणे घाला आणि मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्या
नंतर त्यात मोहरी आणि सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्या व मोहरी फुटेपर्यंत त्यांना परता.
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
आता त्यात चिरलेले आले, कढीपत्ता आणि हिंग घाला आणि काही सेकंद परतुन घ्या.
एकदा चिया सिड्स बुडबुडे झाल्यावर दही, मीठ घालून एकत्र मिसळुन घ्या.
वरील चियाच्या मिश्रणात बनवलेला तडका घालून घ्या व त्यात वरून चिरलेली कोथिंबीर आणि क्रीम (Optional) घालुन थंड करून खायला घ्या
chia seeds benefits in marathi
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
Advertisements