मार्च २०२० मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड -१९ विषाणूची दखल जगाला दिली, तेव्हापासून, कोविड -१९ चा जगातील कोट्यवधी लोकांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे रोगासह उद्भवणार्या लक्षणांबद्दल नवीन शोध लागत आहेत.
अलीकडेच, अनेक रिसर्चमध्ये असे सुचविण्यात आले आहे की उचकी लागणे कोविड -१९ चे संभाव्य व दुर्मीळ लक्षण असू शकते.
उचकी लागणे व नवा कोरोना विषाणू
नवीन रीसर्च च्या अभ्यासानुसार उचकी लागणे हे नव्या कोरोना विषाणूचे लक्षण असू शकते.
नुकत्याच झालेल्या २०२० च्या एका अभ्यासानुसार, एका ६४ वर्षीय व्यक्तीला कोविड -१९ चे एकमेव लक्षण म्हणून सतत उचकी लागल्याचे आढळले.संदर्भ
६४ वर्षीय रुग्ण बिनव्यसनी व त्याला श्वासनलिकेचा कोणताही आजार न्हवता ह्या स्टडी मधील रुग्णाला ७२ तास सतत उचकी लागली होती व कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे दिसत न्हवतीत. तसेच २०२० च्या एका वेगळ्या केस स्टडीमध्ये, ६२ वर्षीय व्यक्तीला नवीन कोरोनाव्हायरसचे लक्षण म्हणून उचकीचा अनुभवही आढळला.संदर्भ
सूचना
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की वर नमूद केलेला अभ्यास केवळ दोन वैयक्तिक प्रकरणांचा अभ्यास आहे. हा अभ्यास केवळ कोविड -१९ मध्ये येणाऱ्या उचकीचा अभ्यास आहे अधिक पुष्टीकरणासाठी अजून अभ्यास करणे गरजेचे आहे.
केवळ २ व्यक्तींच्या अभ्यासातून काही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही मात्र उचकी सुद्धा एक नवीन लक्षण असू शकते ह्याची पुष्टी करण्यासाठी अधिक रिसर्च महत्वाची आहे.
पुढील लेख
रोगप्रतिकारक शक्ती काशी वाढवावी – how to boost immunity