खर तर या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की जगातील सर्वात लहान देश मुंबई पेक्षा 5 पट लहान आहे.
व्हॅटिकन सिटी अस ह्या देशाच नाव आहे, युरोप मध्ये असलेल्या ह्या देशाच क्षेत्रफळ फक्त 121 एकर एवढं आहे, तसेच अवघे 800-900 लोक एवढी ह्या देशाची लोकसंख्या आहे.
1929 मध्ये स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा देश रोम,इटलीच्या बॉर्डर ने घेरलेला आहे तसेच रोमन कॅथलिक चर्च चे मुख्यालय सुध्दा ह्या देशात आहे.
अतिशय धार्मिक असलेला हा देश कॅथलिक पोप चालवतात.
व्हॅटिकन सिटी ला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट चा दर्जा प्राप्त आहे, सांस्कृतिक श्रेणीमधून ह्या देशाला हा दर्जा दिला आहे.
Advertisements
व्हॅटिकन सिटी मधील काही प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे
1. सेंट पीटर्स बॅसिलिका –
जगातील काही महत्वाच्या चर्च ला बॅसिलिका असे म्हणतात असाच हा चर्च जगातील सर्वात मोठा चर्च असून ख्रिश्चन धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचा चर्च आहे, सुमारे 1500 – 1600 मधील हे बांधकाम आहे.
2.व्हॅटिकन संग्रहालय –
सुमारे 70,000 शिल्पकला इथे उपलब्ध असून फक्त 20,000 शिल्पकला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
3. सिस्टिन चॅपल-
हा धार्मिक गुरू किंवा पोप यांचं राहण्याचं ठिकाण आहे, सुमारे 1470-1480 मध्ये बांधकाम असून इथे सर्व धार्मिक विधी संपूर्ण केले जातात.
इथे फ्रेस्कोसची मालिका ज्यामध्ये मोसेस चे जीवन आणि ख्रिस्ताचे जीवन दर्शविले गेले आहे.
4. पिनाकोटेका (चित्र संग्रहालय)
इथे 16 खोल्या असून वेगवेगळ्या चित्र आकृती आहेत, एकदा तर नेपोलियनने हे संग्रहालय लुटले देखील आहे.
5.व्हॅटिकन गार्डन –
13 व्या शतकात तयार केलेली ही गार्डन्स अतिशय चांगल्या रीतीने जपलेली असून मनमोहक अनुभव देऊन जातात.
Advertisements