Advertisements
काही आठवड्या पूर्वी एक भयानक चक्रीवादळ बंगाल मध्ये आल होतं, त्यानंतर आता असच एक भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात येत आहे, प्रामुख्याने ह्याचा धोका समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना असेल.
निसर्ग चक्रीवादळाचा वेग किती आहे ?
निसर्ग चक्रीवादळाचा धोक्याचा अंदाज आपण त्याच्या वेगा वरून लावू शकतो, अस सांगितलं जातंय की निसर्ग चक्रीवादळ आतापर्यंतच महाराष्ट्रावर आलेले सर्वात मोठे व वेगवान चक्रीवादळ आहे. निसर्गाच्या वाऱ्याचा वेग 95-105 KM/hr असून हे चक्रीवादळ 11-20 KM/hr च्या वेगाने अलिबाग च्या दिशेनं येत आहे.
महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ येण्याची शक्यता ?
१. रायगड
२.रत्नागिरी
३.मुंबई
४.सिंधुदुर्ग
५.पालघर
६.सातारा
७.नाशिक
8.धुळे
साधारण किती वाजता महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ धडकेल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुमारे १ वाजता हे चक्रीवादळ अलिबागला धडकेल. तसेच सुमारे १२ पासून मुंबईसह रायगड जिल्ह्यात वारा व मुसळधार पाऊस सुरू होईल असाही अंदाज आहे.
windy.com वरून तुम्ही निसर्ग चक्रीवादळ सध्या कुठे आहे हे बघू शकता.
Advertisements