काय सांगशील धोंड बा!! Xiomi Mi 10 5G झालाय लाँच

Advertisements

आली लहर आणि केला कहर अशी परिस्थिती सध्या Mi ची आहे.कारण कोरोना लॉकडाउन मध्ये चक्क 49,999 रुपयांचा फोन Mi ने केलाय लाँच.आणि, तो भि कुठं ? भारतात !!

तस बघावं तर पन्नास हजारातून एक रुपया कमी केल्यावर ही किंमत लोकांना काहीच वाटत नाही असे बीजिंग च्या गाववाल्यांना वाटतय, असो !

चला तर पाहुयात काय आहे ह्या फोन मध्ये
2 मेगा पिक्सेल + 108 मेगा पिक्सेल + 2 मेगा पिक्सेल + 13 मेगा पिक्सेल अशे चार कॅमेरे आहेत Mi 10 5g मध्ये.
Snapdragon 865 Soc जगातील सर्वात अत्याधुनिक प्रोसेसर सुध्दा इथे Mi ने दिला आहे सोबतच तुम्हाला भेटेल 6.67 इंच डिस्प्ले ज्याला 90 Hz चा रिफ्रेश रेट आहे.
8 जीबी च्या रॅम सोबत Liquidcool 2.0 Vapor Chamber  असे अत्याधुनिक features Mi 10 5g मध्ये आहेत.भारतात 4g चे भाव परवडत नसतांना 5g ची स्वप्न सुद्धा हा फोन दाखवतो त्याबद्दल अखिल भारतीय Mi स्वस्तात मस्त फोन देतो म्हणणारे संघटनेच्या तर्फे Mi ला एक नारळ आणि पुष्पगुच्छ.
तसेच Mi 10 5g ची थेट स्पर्धा असेल ती म्हणजे स्टीव्ह भाऊंच्या iphone Xr व Mi चे गाववाले Oneplus 7T Pro तसेच आगामी  Oneplus 8 आणि Oneplus 8 Pro सोबत.Mi 10 5g सध्या भारतातील हिरव्या व भगव्या भागांमध्ये प्रीपेड प्री ऑर्डर्ससाठी उपलब्ध आहे.mi.com वरून थेट तुम्ही ऑर्डर करू शकता.




तर मित्रांनो आणि मैत्रित्रींनो आपल्या लाडक्या भाषेला Support करा अशेच अनेक ब्लॉग आपण आपल्या लाडक्या भाषेत आणत राहू, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया आपल्या ब्लॉग ला  Subscribe करा आणि Mi 10 5g  बद्दल तुम्हाला काय वाटत हे आम्हाला कॉमेंट्स करून कळवा.

अस्विकरण /Disclaimer : या वेबपोर्टलवरील लेखनामध्ये व्यक्त झालेली मते केवळ मनोरंजनासाठी असून लेखकाचा कोणालाही दुखवायचा हेतू नाही, तरीही कोणाचीही भावना दुखावली असल्यास आम्ही क्षमा मागतो !!!अस आम्ही बोलणार नाही कारण ज्याला येतो राग त्याला…………….  फुडच समजुन जा.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *