अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China


सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की चिनी मालावर बहिष्कार का घालावा?

2019 मध्ये भारताने चीन कडून 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स चा माल आयात केला व फक्त 16.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स चा माल निर्यात केला,चीन हाच पैसा भारताच्या विरोधात लढायला वापरतो.
चीन, भारत काय जगातील कुठल्याही देशासोबत सैनी युध्द करणार नाही म्हणून त्याच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालणे हा एकमेव पर्याय आहे म्हणूनच सोनम वांगचुक यांनी सांगितले आहें की सॉफ्टवेअर इन अ वीक आणि हार्डवेअर इन अ इयर ही संकल्पना खूपच चांगली आहे.
मेड इन चायना सोबत भारतातील असणाऱ्या कंपन्या ज्यामध्ये चिनी कंपन्यांची भागीदारी आहे त्यांचा सुद्धा बहिष्कार झाला पाहिजे.
खलील दिलेल्या यादीमधून तुम्ही समजू शकता चीन भारतातील मार्केट मध्ये कसं आपलं वर्चस्व निर्माण करत आहे.

Advertisements

अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ?

जर चिनी कंपन्यांची भागीदारी 10 ते 20 टक्के असेल तर त्यातून त्यांना फारसा नफा मिळत नाही पण हीच भागीदारी 30-50 टक्के असेल तर  एवढा नफा थेट चिन ला जातो आणि जर ही भागीदारी 50 पेक्षा जास्त असेल तर समजून जा ती कंपनी चिनी मालकीची झाली व तिथून तुमचा डेटा सुद्धा ते चिनी सरकार ला देऊ शकतात कारण सर्व चिनी कंपन्या संपूर्ण चिनी सरकार चायनीज रिपब्लिक पार्टीच्या तालावर नाचतात व तेच करतात जे चीन सरकार त्यांना सांगते.

1. पेटीएम (Paytm)

अस्सल भारतीय असणाऱ्या ह्या कंपनी मध्ये चिनी कंपनी अलिबाबा ची  40% भागीदारी आहे, त्यामुळे Paytm च 40 % नफा थेट चीनला जातो


2.स्वीग्गी (Swiggy)

बंगळुरू येथे स्थापन झालेल्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप मध्ये चिनी कंपनी टेंसेन्ट चे 31% भागीदारी आहे.

3.झोमॅटो (Zomato)

Ant Financial ह्या कंपनीकडे झोमॅटो चे 30 % भागीदारी आहे, Ant Financial ही कंपनी अलिबाबा ग्रुप ची कंपनी आहे.

4.OYO (ओयो)

नवीन पिढीच अत्यंत प्रेक्षणीय असलेले स्थळ म्हणजे OYO, चिनी कंपनी Didi Chuxing ची ओयो मध्ये 42 % भागीदारी आहे त्यामुळे समजून जा की तुम्ही भरलेल्या पैस्यातून 42% रक्कम ही थेट चीन मध्ये जाते.

5.बायजु (BYJU’S)

भारतात स्थापन झालेली ऑनलाईन लर्निंग देणारी बायजु ह्या कंपनीमध्ये 21.8% भागीदारी चिनी कंपनी Tencent ची आहे

6.बिग बास्केट (Big Basket)
ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी करणारी बिग बास्केट मध्ये चिनी कंपनी Alibaba Group ची  26.6 % भागीदारी आहे तसेच अजून एक चिनी कंपनी TR Capital ची चक्क 40% भागीदारी आहे त्यामुळे ही कंपनी भारतीय फक्त नावाला आहे असे समजणे चुकीचे ठरणार नाही.

7.ड्रीम इलेव्हन (Dream 11)


भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन बेटिंग कंमनी ड्रीम इलेव्हन मध्ये चिनी कंपनी Tencent ची जवळपास 35% भागीदारी आहे तसेच अजून एक चिनी कंपनी  Steadview ची सुद्धा ड्रीम इलेव्हन मध्ये भागीदारी आहे.

एवढंच नाही मित्रानो आशा बऱ्याच भारतीय कंपन्या आहेत ज्यामध्ये चिनी कंपन्यांची भागीदारी जास्त आहे  जशे की Flipkart, Udaan, Ola, Policybazaar, Delhivery.

फक्त चिनी मालावर बहिष्कार करून चालणार नाही आपल्याला चीनला जास्तीत जास्त तोटा करून घ्यायला लागेल तेव्हा चीन भारता समोर घुडगे टेकेल, चिनबरोबर सैनी युध्दात आपले सैनिक उत्तर देतील पण आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेवर घाव घालून आपल्या देशाला मदत करू शकतो.
Tencent,Alibaba,Steadview आशा बऱ्याच चिनी कंपन्या भारतातील जास्त चालणाऱ्या स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक करतात व हळूहळू आपले वर्चस्व जमावतात चीन ची सरकार सुद्धा आशा कंपन्यांना साथ देते.
एकीकडे चीन बाहेरच्या देशांना स्वतःच्या देशात घेत नाही व दुसरीकडे बाहेरच्या देशातल्या लहान कंपन्या विकत घेते अशी चीनची रणनीती वर्षानुवर्षे चालत आली आहे.
तर मित्रांनो व मैत्रिणींनो चिनी कंपन्यांची भागीदारी असलेल्या सॉफ्टवेअर व इतर सुविधा देणाऱ्या भारतीय कंपन्यांचा सुद्धा तेवढाच बहिष्कार करा जेवढा मेड इन चायना चा करताय.

धन्यवाद…/…
लेख आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *